एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर संस्था कर्मचाऱ्यांचा लैंगिक अत्याचार, सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल लातूर जिल्ह्यातील घटना
लातूर /प्रतिनिधी रुपेश डोलारे : औसा तालुक्यातील एका नामांकित संस्थेतील एचआयव्ही(Hiv) संक्रमित अल्पवयीन मुलीवर या संस्थेतील एका कर्मचाऱ्यांनी बलात्कार करून तिला गर्भवती केले पीडीतीचे फिर्यादीवरून संस्थाचालका सह कर्मचारी व अन्य सहा जणाविरुद्ध पोस्को कायद्या अंतर्गत विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की औसा तालुक्यातील एका नामांकित संस्थेतील येथे Hiv संक्रमित अनाथ मुलीसाठी सेवालय प्रकल्प आहे. या प्रकल्पात दाखल झालेल्या एचआयव्ही संक्रमित अल्पवयीन मुलीवर संस्थेतील कर्मचारी यांनी बलात्कार केला त्यात पिडीता गर्भवती राहिली हा प्रकार सेवालालयाचे प्रमुख रवी बापटले यांना सांगितला आरोपींनीही पिडीतिची ऐकले नाही तिला जिवे मारण्याची धमकी दिली सदर पिढीत चार महिन्यांची प्रेग्नेंट असल्याचे समजल्यानंतर लातूरचे हॉस्पिटलमध्ये तिच्या गर्भपात करण्यात आला .याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात सेवालय प्रमुख यांच्यासह सहा कर्मचारी व लातूरच्या एका हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्या विरोधात औसा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंकर मनाळे करीत आहेत.
सेवालयाला बदनाम करण्याची विरोधकांची षडयंत्र
सदर पीडित आहे मागील चार महिन्यापासून सेवालालयात नव्हती सेवालयातील मुलगा अमित महामुनी हा सदर मुलगी सेवालालयात येण्यापूर्वी पाच महिने दोन दिवस अगोदरच निघून गेला आहे.सध्या तो मुंबई येथे काम करीत आहे घटनेतील प्रकार संपूर्णपणे सेवालयाची बदनामी करण्यासाठी केलेले कारस्थान आहे यापूर्वीही अनेकांनी याचेही संक्रमित मुलांच्या प्रकल्पाला विरोध केला आहे यातून सदर कुंभाड रचण्यात आले आहे.
प्राध्यापक रवी बापटले सेवालय प्रमुख.
0 Comments