तुळजापूर- धाराशिव रोडवरील हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला फोटो काढण्यासाठी बोलावून मारहाण करून अपहरण करण्याचा प्रयत्न-Hotel Bhagyashree Owner kidnap

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर- धाराशिव रोडवरील हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला फोटो काढण्यासाठी बोलावून मारहाण करून अपहरण करण्याचा प्रयत्न-Hotel Bhagyashree Owner kidnap

तुळजापूर- धाराशिव रोडवरील हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला फोटो काढण्यासाठी बोलावून अपहरण करण्याचा प्रयत्न-


धाराशिव : तुळजापूर धाराशिव रोडवरील हॉटेल भाग्यश्री चे मालक यांना हॉटेल समोर फोटो काढण्यासाठी बोलावून गाडी भोवताली घेराव घालून अनोळखी इसमाने गाडीमध्ये जबरदस्तीने बसवुन अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत हॉटेल भाग्यश्री चे मालक नागेश मडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 23 रोजी म्हणजे आज रोजी बुधवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास हॉटेल समोर चार चाकी वाहनामध्ये आलेल्या काही इसमाने त्यांना फोटो काढण्यासाठी बोलवले यानंतर ते गाडी जवळ गेली असता त्यांना घेराव घालून गाडीमध्ये बसवून त्यांच्या खांद्याला मानेला मारहाण करून हॉटेल हॉटेल पासून पाच किलोमीटर अंतरावरील वडगाव सिद्धेश्वर पुलाजवळ फेकून दिले, तसेच या गाडीमधील ड्रायव्हर हा याला जिवंत सोडायचं नाही याला मारून टाकायचं अशी जीवे मारण्याची भाषा वापरत असल्याचे सांगितले. या गाडीमधील तीन नागरिक हे मुस्लिम समाजातील असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या जीवाला या इसमापासून धोका आहे या इस्मांना तात्काळ अटक करण्याची मागणी हॉटेल भाग्यश्री चे मालक हे करत आहेत.

 बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 https://youtu.be/y6Y7KV-xapE?si=hOmTXAsqsN97Voxw

Post a Comment

0 Comments