घरकुल योजनेच्या आनलाइन Survey मुदतवाढ -Gharkul Yojna online form

Hot Posts

6/recent/ticker-posts

घरकुल योजनेच्या आनलाइन Survey मुदतवाढ -Gharkul Yojna online form


नमस्कार आपण पहात आहात बालाघाट न्यूज टाइम्स! आज आपण घरकुल योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट जाणून घेणार आहोत. जर तुम्ही अजूनपर्यंत पक्के घर बांधले नसेल, तर शासनाकडून घरकुल (Gharkul yojna) योजनेअंतर्गत तुम्हाला घर बांधण्यासाठी २ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. पण यासाठी तुम्हाला घरकुल योजनेचा फॉर्म(Gharkul yojna online form) वेळेत भरून द्यावा लागतो.

 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील प्रत्येक गरजू कुटुंबाला स्वतःचे घर देण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाअंतर्गत पीएम आवास(Pm Aawas Yojana)  योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. या योजनेअंतर्गत 2025 च्या सर्वेक्षणासाठी आधीच दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर, आता पुन्हा एकदा मोठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही घोषणा विशेषतः त्या कुटुंबांसाठी आनंदाची बातमी आहे ज्यांना अजूनही स्वतःचे घर मिळालेले नाही.मागील काळात सरकारने घरकुल योजनेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख १८ जुन २०२५ ठरवली होती. मात्र, बरेच लाभार्थी अजूनपर्यंत फॉर्म भरले नव्हते. अनेकांना ऑनलाइन फॉर्म भरण्यात अडचणीही आल्या. म्हणून सरकारने या मुदतीत १५ दिवसांची वाढ केली आहे. आता तुम्ही घरकुल योजनेचा फॉर्म ( ३१ जुलै २०२५ पर्यंत भरू शकता ही मुदतवाढ शेवटची संधी असणार आहे.

जे नागरिक अजूनही पीएम आवास(pm aawas yojana)  योजनेसाठी अर्ज केलेला नाही, त्यांच्यासाठी आता 31जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे अनेक पात्र कुटुंबांना योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments