हॉटेल भाग्यश्री मालकाच्या अपहरण व मारहाण प्रकरणी अखेर पाच आरोपींना अहिल्यानगर जिल्ह्यातील ठोकल्या बेड्या-
धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या धाराशिव ते तुळजापूर रोडवरील हॉटेल भाग्यश्रीच्या(HotelBhagyashree) मालकाची कार मध्ये अपहरण करून मारहाण करत सोन्याची चैन लुटून घेण्यात आली होती.ही घटना दिनांक २३ जुलै रोजी घडली होती याप्रकरणी दिनांक २६ जुलै रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात (Dharashiv city police)सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पाच आरोपींचा तपास करून पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड(Jamkhed) येथून ताब्यात घेतले आहे. यातील चार आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे एका आरोपीची तब्येत बिघडल्यामुळे त्याच्यावर धाराशिव(Dharashiv) येथील शासकीय रुग्णालय उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव ते तुळजापूर रोडवरील (Dharashiv to -Tuljapur Road)वडगाव सिद्धेश्वर गावाजवळील हॉटेल भाग्यश्री चे मालक नागेश विकास मडके(Nagesh Madke) वय (33) राहणार माथाडी तुळजापूर नाका बार्शी हल्ली राहणार वडगाव सिद्धेश्वर(Wadgaov Sidheshwar) हे दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आपल्या हॉटेल समोर उभे होते यावेळी पांढऱ्या व निळ्या रंगाची रेडियम असलेली ईरटीका कार घेऊन जेवणाकरता आलेल्या 6 इस्मानी त्यांना फोटो काढण्याच्या बहाण्याने नागेश यांना कारजवळ बोलावून घेतले त्यानंतर फोटो काढत असताना त्यांचे दोन्ही हात काचेच अडकवून त्यांना शिवीगाळ करत फरपटत नेऊन ठार मारण्याच्या उद्देशाने बंदुक कपाळावर लावत मारहाण करून गंभीर जखमी होते त्यानंतर त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन ओढून घेत त्यांना रस्त्यावर फेकून फरार झाले होते.
या प्रकरणी नागेश मडके यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी जलद गतीने करून दिनांक 29 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथून पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. भाग्यश्री हॉटेलचे मालक श्री मडके यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेला उधान आले होते हा बंदुकीचे लायसन मिळवण्यासाठी बनाव करत असल्याचा आरोपही सोशल मीडियावरून केला होता यामुळे या प्रकरणात पोलिसांना संशय येत होता.
या प्रकरणी पोलिसांनी ही श्री मडके यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली होती श्री मडके यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता यानंतर अखेर सहा इस्मविरुद्ध दोन दिवसांनी गुन्हा दाखल झाला होता या घटनेचे गांभीर्य ओळखून धाराशिव शहर पोलिसांनी तपासाची चक्री जलद गतीने फिरवून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक रीतु खोकर अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या पथकाने केली आहे. हा हल्ला नेमका कशामुळे केला व कोणामुळे केला याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
0 Comments