उल्लेखनीय..! मुलीच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तुळजापूर शहरातील तट कुटुंबीयांनी उभारली जिजामाता नगर नावाची प्रवेशद्वार भव्य व सुंदर कमान
तुळजापूर/प्रतिनिधी रूपेश डोलारे :आजच्या या युगात वाढदिवसावर लोक लाखो रूपये खर्च करतात. पण, तुळजापूर शहरातील श्री बालाजी तट यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून जिजामाता नगर प्रवेशद्वार अशा नावाची भव्य व सुंदर कमान उभारून आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला.
तुळजापूर येथील जिजामाता नगर येथील रहिवासी श्री बालाजी तट यांनी स्वतःच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त कुमारी जान्हवी बालाजी तट या प्रभागासाठी काहीतरी उपयुक्त करून साजरा करण्याचा निर्णय घेतला.या भावनेतून "जिजामाता नगर प्रवेशद्वार" अशा नावाची भव्य व सुंदर कमान उभारली आहे.या कमानीचे उद्घाटन जिजामाता नगरमधील समस्त महिलांच्या. पारूबाई वीर जिजाबाई दाणे , मथुरा शिरसागर पारूबाई सावंत रेखा कापसे उषा कापसे उषा मोरे जया कापसे सुरेखा जाधव रुबीना पलंगे मंगल जाधव सुरेखा चोपदार सरुबाई काळे अश्विनी काळे सुलोचना काटे पवार मावशी घोडके मावशी रेखा घोडके कालींदा यादव ुक्मीनबाई सावंत .. यांच्यासह 108 महिलांच्या ..शुभहस्ते करण्यात आले.
सर्व महिला, जिजामाता प्रतिष्ठानचे जेष्ठ नागरिक, तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थितीत यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील. शिवसेनेचे शहर प्रमुख सुधीर कदम. राहुल जी खपले. काँग्रेसचे नगरसेवक रणजीत इंगळे. काँग्रेसचे युवा नेते अमोल कुतवळ जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मधुकर शेळके.मा जी भाऊ भांजी.शिवसेनेचे नेते अर्जुन साळुंखे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चोपदार. राष्ट्रीय इंटक काँग्रेसचे सचिव किरण यादव. शेका पक्षाचे उत्तम अमृतराव. राष्ट्रवादीचे मुस्लिम लीगचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शेख व्यापारी काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष नरेश पेंदे. प्रकाश दबडे नाग ना थ हाके. निलेश सिरसाट. महावीर कद ले रोहित शेंडगे. इत्यादी सह अनेक मान्यवर व महिला भगिनी उपस्थित होत्या.
0 Comments