दुर्दैवी घटना : पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्याचा मृत्यू उमरगा तालुक्यातील घटना-Umerga- Dharashiv -dalinba News

Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना : पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्याचा मृत्यू उमरगा तालुक्यातील घटना-Umerga- Dharashiv -dalinba News

दुर्दैवी घटना : पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्याचा मृत्यू उमरगा तालुक्यातील घटना


धाराशिव: दोन चिमुकले खेळत खेळत पाय घसरून शेतातील पाझर तलावात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उमरगा तालुक्यातील डाळिंब येथील शिवाजीनगर तांड्यावर दि,२८ रोजी सायंकाळी उघडकीस आली  आहे ;या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की उमरगा तालुक्यातील डाळिंब येथील शिवाजीनगर तांड्यातील सुशांत बाळू चव्हाण वय (६) व प्रमोद प्रकाश चव्हाण वय (७) हे दोघे चुलत भाऊ खेळत होते दरम्यान शिवाजीनगर तांड्यातील शेतकरी पाझर तलावाच्या लगत असलेल्या शेतात खुरपणी करण्यासाठी त्यांचे आई वडील कामाला गेले होत खुरपणीत गुंतलेल्या शेतकऱ्यांची दोन्ही मुले खेळत शेजारील पाझर तलावात पाय घसरून तलावात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला .यावेळी आई-वडिलांनी नातेवाईकांनी सर्वत्र शोधा शोध केली असता त्यांना कोठेही मुले आढळून आले नाही त्यानंतर त्यांना तलावामध्ये लाल रंगाच्या शर्ट दिसून  असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांना येणेगुर येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋतुजा साळुंखे यांनी उत्तरीय  तपासणी करून दोन्ही मुलाचे मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात दिले. ऐन नागपंचमी सण एक दिवसावर असताना या दुर्दैवी घटनेने तालुक्यासह गावावर शोककळा  पसरली आहे.

Post a Comment

0 Comments