शेतकऱ्यांच्या संघर्षास मिळाले यश: उमरगा-लोहारा भागातील ८६ कोटींच्या मदतीमागील अनिल जगताप यांच्या नेतृत्वाची सत्यकथा
आमदार मा. प्रवीणजी स्वामी यांचेही आभार
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा-लोहारा भागातील शेतकऱ्यांना खरीप 2023 मधील अतिवृष्टी नुकसानभरपाईचा शासन निर्णय दिनांक 29 जुलै 2025 रोजी जाहीर झाला. एकूण ₹86.43 कोटींची रक्कम 79,880 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ही मदत मिळवून देण्यासाठी अनिल जगताप यांनी केलेला संघर्ष, आंदोलनं आणि मंत्रालयात थेट पाठपुरावा हा अभ्यासाचा विषय ठरावा.
ही मदत मिळावी यासाठी उमरगा-लोहारा मतदारासंघाचे नूतन आमदार मा. प्रवीणजी स्वामी यांनीही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच अनिलजी जगताप यांच्या विनंत्यांना मान देत आंदोलन, बैठका यासाठी उपस्थिती लावली होती.
या यशाबद्दल उभयतांचे अभिनंदन
मदतीचा तपशील:
लोहारा तालुका: 30,652 शेतकरी – ₹33 कोटी 70 लाख
उमरगा तालुका: 49,228 शेतकरी – ₹52 कोटी 75 लाख
(शासन निर्णय दिनांक – 29 जुलै 2025)
अनिल जगताप या लढवय्या नेतृत्वाची पार्श्वभूमी:
अनिल (दादा) जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष समितीने विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी नेहमीच अत्यंत अभ्यासपूर्वक आणि जोमदारपणे मांडले आहेत.
यावेळीही खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी त्यांनी गावपातळीपासून ते मंत्रालयापर्यंत पाठापुरावा केला. विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांची माहिती गोळा करून, त्यांच्या नुकसानीचे प्रातिनिधिक नमुने सादर करून आणि स्वतः उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार मा. प्रवीण स्वामी यांना सोबतीला घेवून, मंत्रालयात जावून, पुनर्वसन सहसचिव कैलास गायकवाड यांच्यासमोर प्रस्ताव मांडून त्यांनी ही मदत मंजूर करून घेतली.
अनिल जगताप यांच्या कार्याचा मागोवा:
(1) खरीप २०२० - मा.उच्च व सर्वोच्च न्यायालयात यशस्वीरित्या पाठपुरावा करून ४५५ कोटी मिळून दिले.
(2) खरीप २०२० मधील विलंब रकमेसाठी 195 कोटी रु. व्याज मागणी याचिका दाखल व मंजूर, राज्यातील पहिलीच व्याज मागणी याचिका.
(3) खरीप 2021 स्वतःच्या नावें 374 कोटीची उच्च न्यायालयात याचिका दाखल.
(4) खरीप २०२२ राज्य तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल करून यशस्वी निर्णय लावून घेतला व नंतर महसूली कार्यवाही करून केंद्राच्या कंपनीकडून रक्कम वसूल.
(5) खरीप 2023 सर्वच 57 महत्त्वपूर्ण मंडळात 25% अग्रीम मंजूर करून आत्तापर्यंत 293 कोटी वाटप. तसेंच जिल्हास्तरीय 7 बैठकामध्ये सहभाग.
(6) धाराशिव जिल्ह्यातील बळीराजाच्या हितासाठी सदैव कटीबद्ध.
(7) स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना खाजगी विमा कंपन्यांकडून शासनाकडे घेण्यास भाग पाडले.
(8) पीक विम्याच्या 14 जिल्हास्तरीय बैठक 4 विभागस्तरीय व 5 राज्यस्तरीय मंत्रालयातील बैठकीत बळीराजाची न्याय बाजू मांडली. परिणामी वीमा मंजूर.
अनिल दादांचा लढा म्हणजे ‘शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची’ याचे मूर्त स्वरूप
कोल्हापूर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी जसा एखादा झुंजार नेता संघर्ष करतो, तसा आवाज धाराशिवसारख्या मागास जिल्ह्यासाठीही उठावा, ही भावना लक्षात घेऊन अनिल जगताप यांनी दरवेळी ‘फाइल’ पेक्षा ‘फील्ड’वरच उपस्थित राहण्यास प्राधान्य दिले. हेच कारण आहे की, "अनिल दादा म्हणजे फक्त आंदोलक नाहीत, तर आंदोलनाच्या माध्यमातून सत्तेला जागं करणारे आणि कामाची परिणामकारकता घेऊन येणारे" असे चित्र जनमानसात निर्माण झाले आहे.
भविष्यातील नेतृत्वाचा चेहरा?
प्रसारमाध्यमांमध्ये आणि जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात असा चर्चेचा सूर उमटतोय की, अनिल जगताप हे उमरगा-लोहारा भागातील ‘राजकीय पर्याय’ म्हणून उदयास येत आहेत. शेतकऱ्यांपासून ते युवकांपर्यंत, आणि तळागाळातील लोकांपासून ते प्रशासनातल्या अधिकाऱ्यांपर्यंत त्यांनी निर्माण केलेली विश्वासाची जागा हे त्यांच्या नेतृत्वाचे मोठे यश म्हणावे लागेल.
आजच्या काळात नेतृत्व म्हणजे केवळ झेंडा, माईक आणि सेल्फीपुरता न राहता, समस्येच्या मुळाशी जाऊन ठोस निर्णय घेण्याची हिंमत असलेले नेतृत्व हवे. अनिल (दादा) जगताप यांनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लढून मिळवून दिलेल्या या यशाची दखल घेत, ते भविष्यातही तितक्याच परिश्रमाने जिल्ह्याचा आवाज म्हणून पुढे येतील, अशी आशा आहे.
© ऍड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)
0 Comments