करजखेडा येथे जमिनीच्या वादातून पती- पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या फरार आरोपीला 24 तासाच्या आत ठोकल्या पोलिसांनी बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी-
धाराशिव / रुपेश डोलारे(प्रतिनिधी): धाराशिव तालुक्यातील करजखेडा(पाटोदा ) येथे भर चौकात दिनांक 13 रोजी दुपारी जमिनीच्या वादातून पती- पत्नीची निर्गुण हत्या करण्यात आली होती. या हत्तेतील आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. या आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत पुणे येथून गजाआड करुन स्थानिक गुन्हे शाखेने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे बेंबळी यांच्या सहकार्याने पार पडली.
या घटनेबाबत परीक्षांमुळे मिळालेली अधिक माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथे काल घडलेल्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिस ठाणे बेंबळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयितांवर गुप्त पाळत ठेवून होते. गुन्हा 209/2025 कलम 103, 3(5) बीएनएस अन्वये नोंदविण्यात आला होता. सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या आधारे माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी १) जीवन हरिबा चव्हाण आणि २) हरिबा यशवंत चव्हाण हे पुण्यात नातेवाईकांकडे पळून गेले असल्याचे समजताच तत्काळ पुणे गाठून लपून बसलेल्या संशयितांना शोधून काढले.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ पुण्यात दाखल झाले. पथकाने आरोपींच्या नातेवाईकांच्या घरावर पाळत नजर ठेवून,संशयित असल्याचे अधिकृत माहिती मिळताच योग्य क्षण साधून आरोपींना जेरबंद केले. दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन धाराशिव येथे आणण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना पोलीस ठाणे बेंबळी येथे हजर करण्यात आले आहे .
या यशस्वी कारवाईत पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, स.पो.नि. सचिन खटके, पोह. विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गाडेकर, पोना. बाबन जाधवर, अशोक ढगारे, विजय धुळे, महेबुब अरब आदींचा विशेष सहभाग होता.
या घडलेल्या दुहेरी हत्याखंडाच्या घटनेमुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेने दाखविलेल्या तत्परतेमुळे गुन्ह्याचा तपास करून आरोपी बाप लेकांना बेड्या ठोकून वेगाने छडा लावल्यामुळे नागरिकांमध्ये दृढ विश्वास निर्माण झाला आहे.
![]() |
![]() |
मयत सहदेव पवार व पत्नी प्रियंका पवार |
0 Comments