लग्नाचे आमीष दाखवून ४० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार,लातुर जिल्हातील घटना
लातुर: आरोग्य केंद्रात चालक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून ४० वर्षीय विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना फेब्रुवारी 2025 मध्ये घडली या प्रकरणी लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत अधिक पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,की लातूर (Latur) येथील काझी मोहल्यात राहणारा एक व्यक्ती हा हा रेणापुर येथील ग्रामीण रुग्णालयात (Gramin Hospital)चालक पदावर काम करीत होता. तो वयोमानुसार त्या पदावरून सेवानिवृत्त झाला आहे ; त्यांनी याच रुग्णालयातील कामगार महिलेला त्याच्या लातूर येथील घरी आणून तिला लग्नाचे आमीष दाखवले तिच्यावर लैंगिक अत्याचार केला ही घटना फेब्रुवारी 2025 मध्ये घडली आहे. त्यानंतर या दोघांची भेटी झाली नाही मागील चार दिवसापासून सदर महिलेने विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात येऊन आरोपी (Accuse) याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दिली पोलिसांनी सदर महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी इसमाविरूध्द यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 540 / 25 कलम 64 352 351 (2) (3) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा(BNS) दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एस मुळे हे करत आहेत.
0 Comments