हृदयद्रावक घटना : पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने उचलले टोकाचे पाऊल, चार चिमुकल्या मुलासह स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या-
अहिल्यानगर/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar)राहाता तालुक्यात शनिवारी दि,१६ रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. कौटुंबिक वादाने त्रस्त झालेल्या एका बापाने आपल्या चार लहान मुलांसह आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अरुण काळे (वय 30, रा. चिखली कोरेगाव, ता. श्रीगोंदा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पत्नीसोबतच्या वादामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , अरुण काळे यांचा आठ दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीसोबत वाद झाला होता. या वादामुळे त्यांची पत्नी त्यांना सोडून आपल्या माहेरी येवला येथे निघून गेली होती. पण ती परत येत नव्हती. अरुण काळे आपल्या चार मुलांसह मोटारसायकलवरून श्रीगोंदा येथून कोहाळे शिवारात आले. शिर्डी-नगर बायपासजवळ(Shridi -Nagar-Bypass) मोटरसायकल उभी करून त्यांनी चारही मुलांना विहिरीत ढकलले आणि त्यानंतर स्वतःही उडी मारली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
स्वतःचे हात-पाय बांधून घेतली विहिरीत उडी
या घटनेत अरुण काळे यांच्यासह त्यांची मुलगी शिवानी (वय 8) आणि तीन मुले प्रेम (वय 7), वीर (वय 6) आणि कबीर (वय 5) यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून, उर्वरित दोन जणांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांना अरुण काळे यांचा मृतदेह एक हात व एक पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे त्यांनी पूर्वनियोजित पद्धतीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती केलवडची पोलीस पाटील सुरेश गमे यांना मिळाली त्यांनी त्वरित राहता पोलीस ठाण्याची संपर्क साधला यावेळी नितीन चव्हाण अग्निशमक प्रमुख अशोक साठे आणि थोरात हे आपत्ती निवारण पथकासह घटनास्थळी दाखल झाले विहिरीत तीस ते पस्तीस फूट पाणी असल्याने मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या सुरुवातीला दोन लहान मुलांचे मृतदेह करण्यात आले त्यानंतर अरुण काळे यांचा मृतदेह भार काढण्यात आला रात्री उशिरा उर्वरित दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले.
शिवारात सापडली मोटारसायकल
घटनास्थळापासून काही अंतरावर अरुण काळे यांची मोटारसायकल उभी आढळली. पोलिसांच्या माहितीनुसार, ते आपल्या मुलांसह मोटारसायकलवरून राहाता तालुक्यातील कोहाळे शिवारात आले होते. शिर्डी–नगर बायपासलगत वाहन उभे करून ते मुलांसह विहिरीपर्यंत गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
शाळेतून मुलांना घरी आणले आणि…
मृतांपैकी दोन मुले अहिल्यानगरमधील आश्रमशाळेत शिकत होती. घटनेच्या दिवशी अरुण काळे यांनी आपल्या दोन मुलांना आश्रमशाळेतून घरी आणले होते. ध्वजारोहणानंतर त्यांनी मुलांना पत्नीच्या माहेरी नेण्याचे सांगितले होते. मात्र, कोऱ्हाळे शिवारात येताच त्यांनी चारही मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही उडी घेतली. एका क्षुल्लक कौटुंबिक वादातून पाच निष्पाप जीवांचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक पास करत आहेत.
अहिल्यानगर मधील वस्तीगृहातून मुलांनाही घेतले सोबत
अरुण काळे हे माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी येवला येथे चालली होते त्यांची मुले अहिल्यानगर येथील वस्तीगृहात शिकतात तेथून त्यांनी मुलांना घेतले किलवडशिवारात आल्यावर मोबाईल फोनवर पति व पत्नीत वाद झाले त्यानंतर काळे यांनी चार मुलाचा विहिरीत उडी घेतल्याची प्राथमिक तपासास समोर आली आहे घटनास्थळी सापडलेली दुचाकी मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला प्राथमिक दृष्ट्या पती-पत्नीच्या वादातून घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस उपाधीक्षक शिरीष माने मी यांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण काळे यांची पत्नी येवला येथे माहेरी गेली होती तिला आणण्यासाठी तो मुलासह मोटरसायकल वरून येवल्याकडे निघाला होता दरम्यान पत्नीला फोन करून " तू नांदायला आली नाही स तर मी मुलांना ठार मारेन" अशी धमकी दिल्याचे समजते त्यानंतर त्याने मुलासह विहिरीत उडी घेतली घटनास्थळी आढळलेली मोटरसायकल आणि पण मोबाईल वरून मृतदेहाची ओळख पटली या घटनेने राहता तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला आहे.
0 Comments