!!! जनतेच्या मनातील आमदार एक लढवय्या नेता मा.आ.चंद्रशेखरजी घुले पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!

Hot Posts

6/recent/ticker-posts

!!! जनतेच्या मनातील आमदार एक लढवय्या नेता मा.आ.चंद्रशेखरजी घुले पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!

 !!! जनतेच्या मनातील आमदार एक लढवय्या नेता मा.आ.चंद्रशेखरजी घुले पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!



[ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755 /9270044251


सामाजिक परीवर्तन आणि बदलाचे साक्षीदार असलेल्या लोकनेते स्व. मारुतरावजी घुले पाटील यांच्या सुसंस्कृत व सामाजिक हित जोपासना या गुणांची जपवणूक करून राजकीय प्रवास करणारे, मिळालेल्या संधीचे सोने करणारे, कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी नेतृत्व असलेले आणि पराभवाने खचून न जाता राजकीय संघर्ष सुरू ठेवणारे शेवगाव पाथर्डी- नेवासा तालुक्यातील जनतेसाठी सदा कार्यतत्पर असणारे, शेवगाव तालुक्यातील जनमानसातील एक लढवय्या नेता म्हणून प्रतिमा निर्माण करणारे जाणते नेतृत्व आदरणीय माजी आमदार श्री. चंद्रशेखरजी घुले पाटील.

सहकारातुन राजकारणात पदार्पण करणारे माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील हे सर्व प्रथम लोकनेते मारुतरावजी घुले पाटील - संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले. दरम्यान राज्य साखर कारखाना अध्यक्षपदही भुषवले. राजकीय पदार्पणात पहिल्यांदा नवनिर्माण झालेल्या व दोन तालुक्याचा विस्तार असलेल्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार झाले. ५ वर्ष विकास योजनांची मोठी भरीव कामे मतदारसंघात केली. मात्र भावनिकता व जातीयवादाकडे झुकलेल्या तालुक्यातील जनतेने आमदारकीची पुन्हा संधी दिली नाही. परंतु इमानेइतबारे काम करत चंद्रशेखर घुले पाटील यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यात पक्ष संघटन सांभाळले - वाढवले. जिल्हा परिषद

मध्ये सौभाग्यवती सौ.

राजश्रीताई घुले पाटील यांच्या माध्यमातून उपाध्यक्ष व नंतर अध्यक्षपद अशा ५ वर्ष कार्यकाळात जिल्हाभर विकास कामे केली. पंचायत समिती माध्यमातून ही शेवगाव

भाविनिमगाव

निवासी संपादक- जलभूमी शंकर मरकड

तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला. मध्यंतरी पक्षाने खांदेपालट करुन पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांस विधानसभा लढवण्याची संधी दिली. तिथे ही चंद्रशेखर घुले पाटील यांनी पक्षादेश मानुन इमानेइतबारे काम केले.

तदनंतर पुन्हा कार्यकर्त्यांच्या  इच्छेनुसार आमदारकी लढवली मात्र पदरी निराशा आली. मात्र खचून न जाता जनसंपर्क आणि जनसेवा सोडली नाही. शेवगाव तालुका असेल नेवासा - पाथर्डी तालुक्यातील विकास होण्यासाठी संघर्ष केला. शेवगाव नगरपरिषदेसाठी आमदार शिवाजी गर्जे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला. जनतेसाठी सदा सर्वदा उपलब्ध असणाऱ्या पराभवानंतर नाउमेद न होणारा एक लढवय्या नेता आणि कार्यकर्त्यां साठी सतत प्रेरणादायी नेतृत्वास

कामे

आज वाढदिवसा निमित्त उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभण्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा....!💐💐🌹🌹


अविनाश देशमुख शेवगांव

सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार

Post a Comment

0 Comments