अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणास मारहाण, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ;उमरगा तालुक्यातील घटना-Umerga Suicide News Crime

Hot Posts

6/recent/ticker-posts

अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणास मारहाण, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ;उमरगा तालुक्यातील घटना-Umerga Suicide News Crime

अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणास मारहाण, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ;उमरगा तालुक्यातील घटना-


धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे: अनैतिक संबंधाच्या वादातून  सतत मारहाण मानसीक ञासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी (नाईक नगर) येथे दिनांक 15 रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगीता पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर राठोड यांच्याविरुद्ध मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुनाम गोपा चव्हाण (वय 35 राहणार नाईकनगर सुंदरवाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी नाईकनगर येथील गुरुनाम चव्हाण याने 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नाईक नगर शिवारातील डॉ. मालपाणी यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी संगीता बाळासाहेब पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या फिर्यादीमध्ये असे नमूद केले आहे की आरोपी शंकर मानु राठोड यांचे गावातीलच शारूबाई या नावाच्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मयत गुरुनाम चव्हाण हा त्या महिलेच्या घरी गेल्याचा राग आरोपी शंकर राठोड यांच्या मनात होता. हाच राग मनात धरून  गुरुनाम यास शंकर राठोड यांनी कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली व त्रास दिला, या मारहाणीमुळे आणि सततच्या त्रासामुळे गुरुनामने हे टोकाचे पाऊल उचलले असे फिर्यादीत नमूद केले आहे. संगीता पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शंकर राठोड यांच्या विरोधात मुरूम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम (BNS) 115(2), 108,352,351 (2)  351 (3) अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments