तुळजापूर तालुक्यातील काटगाव शिवारातुन सौर पाणबुडी संच लंपास, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील काटगाव शिवारातुन सौर पाणबुडी संच लंपास, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

तुळजापूर तालुक्यातील काटगाव शिवारातुन  सौर पाणबुडी संच लंपास, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण


⛔धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे:  तुळजापूर तालुक्यातील काटगाव शिवारातील एका शेतकऱ्यांच्या विहिरीवरील सौर उर्जेवर चालणारी पाणबुडी मोटर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे .याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना चार ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दरम्यान काटगाव येथील शेतकरी पोपट खंडा माळी यांच्या शेतातील विहिरीवर घडली आहे, यावेळी चोरट्याने शेतकरी माळी यांच्या गट क्रमांक 470 व 471 मधील विहिरीवरील तीन एचपी सौर उर्जेवर चालणारी पाणबुडी मोटर, अंदाजे 10,000 किमतीची चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी शेतकरी माळी यांच्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध भारतीय न्याय समितीचे कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी त्यासाठी या सौर पंप योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. मात्र, चोरट्यांची नजर आता या सौर पंपाच्या प्लेटवर पाणबुडी मोटर संचावर पडली आहे. त्यामुळे या चोरट्यांना तात्काळ पकडून या चोऱ्या थांबवण्याची विनंती पोलिसांकडे केली जात आहे. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांना आता सौर पंपाची राखण करण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

Post a Comment

0 Comments