अवैद्य गांजा बाळगणाऱ्या एका महिलेस अटक उमरगा पोलिसाची कारवाई-Umerga Police Trap Marijuana

Hot Posts

6/recent/ticker-posts

अवैद्य गांजा बाळगणाऱ्या एका महिलेस अटक उमरगा पोलिसाची कारवाई-Umerga Police Trap Marijuana

अवैद्य गांजा बाळगणाऱ्या एका महिलेस अटक उमरगा पोलिसाची कारवाई-


धाराशिव/प्रतिनिधी रुपेश डोलारे : अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या एका महिलेस उमरगा पोलिसांनी कारवाई करत एका महिलेस गजाआड करण्यात आली आहे. ही कारवाई दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उमरगा शहरातील मुन्शी प्लॉट येथे करण्यात आले. आरोपी महिलेकडून 10,785 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

ही कारवाई उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक भराटे यांच्या कर्मचाऱ्यांसह श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी शहरातील एका महिलेकड गांजा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार उमरगा पोलिसांनी दिनांक 16 रोजी दुपारी साडेबारा वाजता पंचा सोबत घेऊन मिळालेल्या माहितीनुसार मुंशी प्लॉट निखिल संशयित महिला कमल गोपीनाथ राठोड वय (53) या महिलेच्या घराची झडती घेतली यावेळी महिलेच्या घरी 719 ग्रॅम हिरवट रंगाच्या उग्र वास येत असलेल्या पाने,बिया ,काड्या अमली पदार्थ गांजा आढळून आला. ज्याची किंमत 10, 785 इतकी आहे. यावरून पोलिसांनी सदरील महिलेस ताब्यात घेत उमरगा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापरावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमाच्या कलम 8(क) 20 (ब),(ii) (अ) अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे हे करत आहेत.

सदरची कामगिरी ही। शफकत आमना प्रभारी पोलीस अधीक्षक धाराशिव, सदाशिव शेलार उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उमरगा, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक   प्रल्हाद सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत भराटे , पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक रामहरी चाटे पोलीस हेडकॉन्स्टेबल चैतन्य कोनगुलवार , पोलीस कॉन्स्टेबल जाधव ,शिवलिंग घोळसगांव,  यासीन सय्यद, मनीषा गुंड ,नवनाथ भोरे, योगेश बिराजदार, राजेश वादे यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments