मौजे उमरगा चि.येथे श्री.संत नरसोबाबुवा महाराज यांची पुण्यतिथि मोठ्या उत्साहात होते साजरी.

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे उमरगा चि.येथे श्री.संत नरसोबाबुवा महाराज यांची पुण्यतिथि मोठ्या उत्साहात होते साजरी.

मौजे उमरगा चि.येथे श्री.संत नरसोबाबुवा महाराज यांची पुण्यतिथि मोठ्या उत्साहात होते साजरी.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

श्री.संत तुकाराम महाराज गाथा पारायणाने सोहळा होतो संपन्न.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""

गाव परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद.


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे उमरगा चि.येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दि.१५ ऑगस्ट गोकुळाष्टमी पासून श्री. संत नरसोबुवा महाराज पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ झाला श्री. संत तुकाराम महाराज गाथा पारायणाने हा सोहळा संपन्न होत आहे. काकडा आरती,मूर्ती पूजन, गाथावाचन,हरिपाठ,हरीकीर्तन व हरिजागर अशा भरगच्च कार्यक्रमांचा समावेश आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा असणारे हे उमरगा चि. गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज गुरुवर्य ह.भ.प . बाळासाहेब महाराज यांची सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडली. देहूकर महाराज पंढरपूरकर यांच्या फड परंपरेनुसार पूर्वापार पद्धतीने श्री संत नरसोबुवा महाराज यांची पुण्यतिथी पालखी सोहळा गोपाळपूर (लोहारवाडी) येथून उमरगा चि.येथे आणली जाते आणि काल्याचे कीर्तन झाल्यानंतर नगरप्रदक्षिणा करून मंदिरात विश्रांतीसाठी ठेवली जाते. महाप्रसादाचे वाटप केले जाते. २३ ऑगस्ट रोजी काल्याचे कीर्तन संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प . गुरुवर्य भानुप्रसाद महाराज देहूकर यांचे होणार आहे, पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत नरसोबुवा महाराज भजनी मंडळ उमरगा चि. व लोहारवाडी (गोपाळपूर) येथील ग्रामस्थांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments