मौजे चिकुंद्रा येथे १५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था अणदूर व गुंज संस्था दिल्ली यांचा उपक्रम.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था, अणदूर आणि गुंज संस्था, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिकुंद्रा येथे गुरुवार दि.७ ऑगस्ट रोजी १५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किटचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी संस्थेच्या सचिव कु. बाबई उर्फ सुजाता ताई चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना, शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक केले.शाळेच्या वतीने संस्थेचा स्नेहपूर्वक सत्कार देखील करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक श्री. गजानन मक्तेदार सर यांनी संस्थेच्या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत, संस्थेच्या समाजभिमुख कार्याला सलाम केला.
कार्यक्रमाला श्री. सतीश बोहिते सर, श्री. सचिन ढेपे सर, किरण भिसे मॅडम, प्रवीण सुरोशे सारोळा नितीन सुरवसे रायखेल अनिता अंभोरे भातंबरी पार्वती भगत उज्वला पवार तसेच शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा चिकुंद्रा जिल्हा परिषद शाळा सारोळा जिल्हा परिषद शाळा रायखेल जिल्हा परिषद शाळा भातंबरी या शाळेमध्ये एकूण ४५० शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले शालेय समितीच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री मोहिते, सीआरपी सौ. केसरताई जाधवर, गावातील महिला, बचत गटातील सदस्य, शिक्षकवृंद आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणप्रेमाची आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा ठरली आहे. संस्थेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments