नळदुर्ग बसस्थानकातील अश्लील प्रकारावर मनसेचा आक्रमक पवित्रा; आरोपीवर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी

Hot Posts

6/recent/ticker-posts

नळदुर्ग बसस्थानकातील अश्लील प्रकारावर मनसेचा आक्रमक पवित्रा; आरोपीवर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी

नळदुर्ग बसस्थानकातील अश्लील प्रकारावर मनसेचा आक्रमक पवित्रा; आरोपीवर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी


नळदुर्ग, दि. ८– नळदुर्ग बसस्थानकावर एका मौलवीने मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहत महिलांपुढे अश्लील वर्तन केल्याच्या संतापजनक घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे निवेदन देत POCSO कायद्यान्वये कठोर कारवाई करावी अशी मागणी नळदुर्ग पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात असे नमूद केली आहे की, नळदृग बस स्थानकात दिनांक पाच ऑगस्ट रोजी एका मौलवीने शाळकरी मुली व महिला उपस्थित असताना मोबाईलवर खुलेआम अशील( पॉर्न व्हिडिओ) पाहून ग्रहणास्पद व असभ्य प्रकार केला आहे; या कृत्यामुळे बस स्थानकामध्ये महिलावर्ग व लहान मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे प्रकरण अतिशय निंदनीय असून समाजात एक वाईट संदेश जात आहे. या संपूर्ण प्रकाराची नळदृग पोलीस ठाणे यांनी अद्याप गंभीर दखल घेतली नाही आणि संबंधित व्यक्तीला अटक सुद्धा करण्यात आलेली नाही हे अत्यंत खेद जनक आहे. सार्वजनिक ठिकाणी अशी कृत्य करणे आयपीसी अंतर्गत गुन्हा आहेच; परंतु शाळकरी मुली आणि महिला उपस्थित असल्यामुळे यामध्ये पोस्को ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. असे निवेदनात नमूद केले आहे.

 “महिलांचा आणि शाळकरी मुलींचा अपमान करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना मोकळं सोडणार नाही.” सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे हे गंभीर गुन्हा असून पोलिसांनी तातडीने संबंधित मौलवीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या वेळी मनसेचे विभागप्रमुख गणेश बिराजदार, फुलवाडी शाखाध्यक्ष रामानंद रिंगणे, शंतनू धबाले, विभांशू दासकर, अणदूर शाखाध्यक्ष सोमा आलूरे, सुयोग पाटील, रोहित कलशेट्टी आदी महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“मनसे स्टाईल उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,” असा इशारा देत मनसेने अशा विकृत प्रवृत्तींविरोधात रस्त्यावर उतरून न्याय मिळवण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.


Post a Comment

0 Comments