मौजे इटकळ येथे पौर्णिमा महिला बहुउद्देशिय संस्था व गुंज संस्थेच्या वतीने २५० विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप.

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे इटकळ येथे पौर्णिमा महिला बहुउद्देशिय संस्था व गुंज संस्थेच्या वतीने २५० विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप.

मौजे इटकळ येथे पौर्णिमा महिला बहुउद्देशिय संस्था व गुंज संस्थेच्या वतीने २५० विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""


इटकळ (दिनेश सलगरे) : - मौजे इटकळ येथे पौर्णिमा महिला बहुउद्देशिय संस्था अणदूर व गुंज संस्थेच्या वतीने   जिल्हा परिषद शाळेतील २५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.या उपक्रमात एकूण २५० विद्यार्थ्यांना शालेय किट देण्यात आले.कार्यक्रमास संस्थेच्या सचिव कु. बाबई लक्ष्मण चव्हाण, संस्थेचे व्यवस्थापक श्री. नागेश चव्हाण, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तानाजी देवराव गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण माशाळकर, ग्रामपंचायत इटकळचे ग्रामसेवक  नितीन कांबळे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.शालेय किट मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर  हसू उमटले हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मदत करणे, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावणे व मुलांच्या शिक्षणात गुणवत्ता वाढवणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.मुख्याध्यापक श्री. तानाजी देवराव गायकवाड यांनी संस्थेचे आभार मानताना सांगितले की,विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय मोलाची मदत असून याचा उपयोग मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नक्कीच केला जाईल.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण माशाळकर यांनीही शाळेस दिलेल्या सहकार्याबद्दल संस्थेचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments