हृदयद्रावक घटना : सावत्र आईकडून तीन वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून खून, मोहोळ तालुक्यातील घटना -
सोलापूर/प्रतिनिधी रूपेश डोलारे : सावत्र आईने आपल्या तीन वर्षाच्या सावत्र मुलीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक हृदयद्रावक घटना मोहोळ तालुक्यातील वडवळ स्टॉप येथे दिनांक 1 रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मोहोळ पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करून तातडीने तपासाची चक्रे फिरवून गुन्हा दाखल करून संशयित आरोपी महिलेला गजाआड केले आहे. कीर्ती नागेश कोकणे असे यामध्ये जीव गमावलेल्या चिमुकलीचे नाव आहे तर तेजस्वी नागेश कोकणे राहणार वडवळ स्टॉप तालुका मोहोळ असे सदर सावत्र आईचे नाव आहे या घटनेने वडवळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मोहोळ तालुक्यातील वडवळ स्टॉप येथील विष्णू नरोटे यांच्या भाड्याच्या घरामध्ये राहत असलेल्या तेजस्विनी नागेश कोकणे हिने तिची सावत्र मुलगी कीर्ती नागेश कोकणी वय (३) वर्षे हिचा दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजे पूर्वी हाताने गळा दाबून खून केला ;यापूर्वी अन्न खाणे किंवा शाळेत न जाणे या कारणावरून तेजस्विनी हिने कीर्ती व आकृती या दोघींना मारहाण करून चटके देऊन जखमी करत छळ केला होता याबाबत फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे.
याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 853 / 2025 अन्वे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1) 115, 118 (1) तसेच बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी फिर्याद दिली असून तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन करणे वाड करत आहेत.
0 Comments