श्रावण मासारंभा निमित्त मौजे इटकळ व परिसरात पोथी पुराणास प्रारंभ

Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रावण मासारंभा निमित्त मौजे इटकळ व परिसरात पोथी पुराणास प्रारंभ

श्रावण मासारंभा निमित्त मौजे इटकळ व परिसरात पोथी पुराणास प्रारंभ


""""""""""""'"''''''''''''''"""""""""""""""""""""""""""

ग्रामीण भागात पुन्हा पोथी पुराणास मिळाली नवंसंजीवनी तब्बल वीस गावात सुरू झाली राम कथा.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

आस्था भावार्थ रामायण ग्रुपच्या उपक्रमास तुळजापुर तालुक्यात उत्स्फूर्त असा प्रतिसाद.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे इटकळ व परिसरात पवित्र अशा श्रावण मासारंभानिमित्त पोथी पुराणास मोठ्या उत्साहात व आनंदात प्रारंभ करण्यात आला. आस्था भावार्थ रामायण ग्रुपच्या माध्यमातून गावोगावी मंदिरावर पोथी पुराण सुरू व्हावेत म्हणून रामभक्ताच्या वतीने जन जागृती करण्यात आली आणि गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी खुपच मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसुन आले. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी इटकळ - श्री राम विजय ग्रंथ , काळेगाव - श्री भावार्थ रामायण ग्रंथ, हिप्परगा ताड - श्री भावार्थ रामायण ग्रंथ, अणदूर (खंडोबा मंदिर) - श्री भक्ती विजय ग्रंथ, अणदूर (वत्सलानगर) - श्री हरिविजय ग्रंथ, उमरगा चि.- श्री हरिविजय ग्रंथ, होर्टी - श्री पांडवप्रताप ग्रंथ, खानापुर - श्री राम विजय ग्रंथ, चव्हाणवाडी - श्री हरिविजय ग्रंथ, नळदुर्ग (साखर कारखाना) - श्री राम विजय ग्रंथ, सराटी - श्री शिवलीलामृत ग्रंथ, धनगरवाडी - ज्ञानेश्वर माऊली चरित्र, बोरामणी - श्री भावार्थ रामायण ग्रंथ, येवती - श्री राम अश्वमेध ग्रंथ, चिंचोली - श्री राम विजय ग्रंथ, कर्दळी - श्री भावार्थ रामायण ग्रंथ, सलगरा मडी - श्री पांडवप्रताप ग्रंथ, पितापुर - श्री भावार्थ रामायण ग्रंथ, तीर्थ - श्री राम विजय ग्रंथ , चिवरी - श्री भावार्थ रामायण ग्रंथ आदी गावात मोठ्या उत्साहात ग्रंथ वाचन निरूपण सेवेस सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रत्येक गावोगावी तरुणांचाही प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे. गावोगावी रामकथेसह राम नाम भक्तीची  गोडी लागावी यासाठी आस्था भावार्थ रामायण ग्रुपचे रामभक्त दिनेश सलगरे, हभप शिवाजी महाराज चव्हाण, हभप. आदिनाथ शिंदे, हभप. अशोक राजमाने पाटील, हभप. आप्पाराव जाधव, हभप. साहेबा जेठे, हभप. डॉ. विष्णुपंत मुंढे, हभप. मारुती गायकवाड, हभप. रमेश उंबरे, हभप. नाना शिंदे, हभप. जयंत जाधव, हभप. बळीराम सुरवसे , हभप. देविदास सावंत, हभप. अण्णा जाधव, हभप. आण्णा कदम, हभप. मारुती सोमवंशी , हभप . नागनाथ स्वामी, रामभक्त अरुण दळवे, सहदेव साळुंके, तानाजी महाबोले, दत्ता राजमाने, गोरख तांबे, बिरू दुधभाते, हभप.अशोक जाधव गुरूजी, महादेव धुते आदि रामभक्त परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments