अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल सोलापूर जिल्ह्यातील घटना-
सोलापूर : एका अल्पवयीन तरुणीवर राहत्या घरी नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्या प्रकरणी तरुणावर पोस्को कायद्याअंतर्गत व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार घडत असलेल्या या अत्याचाराच्या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, 14 जून 2025 रोजी दुपारी दोन ते अडीच च्या दरम्यान आरोपी शुभम काळे यांनी आपल्या ओळखीच्या अल्पवयीन तरुणीला जबरदस्तीने आपल्या घरी घेऊन गेला; आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एक महिन्यानंतर पीडित तरुणीने आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र ही घटना जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा जेलरोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
0 Comments