तुळजापूर बस स्थानकात बसमध्ये चढत असताना महिलेचे सव्वा लाखाचे दागिने केले चोरट्याने लंपास, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण-Tuljapur Police Station Robbery Crime

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर बस स्थानकात बसमध्ये चढत असताना महिलेचे सव्वा लाखाचे दागिने केले चोरट्याने लंपास, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण-Tuljapur Police Station Robbery Crime

तुळजापूर बस स्थानकात बसमध्ये चढत असताना महिलेचे सव्वा लाखाचे दागिने केले चोरट्याने लंपास, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण


धाराशिव /प्रतिनिधी -रूपेश डोलारे : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने प्रवासी महिलेचे सव्वा लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी तुळजापूर(Tuljapur)  पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील वर्षभरापासून बस स्थानकामध्ये चोरी लुटालुटी च्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत यामुळे याकडे येथील स्थानिक पोलीस प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे. अशा वाढत्या चोरीच्या  घटनांमुळे प्रवाशासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर येथील जुन्या बस स्थानकत बसमध्ये (St तुळजापूर -सोलापूर बस मध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्स मधुन सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड रक्कम चोरीला गेली आहे या घटनेत एक लाख 24 हजार 800 रुपये चोरीला गेले. योगिता राम शेणमारे (राहणार पिंपळा बुद्रुक ता. तुळजापूर) असे फिर्यादी महिला चे नाव आहे 10 ऑगस्ट रोजी  दुपारी अडीच वाजता सुमारास  ही घटना घडली त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता(BNS) कलम 303 (2) अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments