राज्यात ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेती बाधित 29 जिल्ह्यातील शेत पिकांना फटका शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार कृषी मंत्री भरणे-Krashi Mantri Dattatray Bharne

Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यात ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेती बाधित 29 जिल्ह्यातील शेत पिकांना फटका शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार कृषी मंत्री भरणे-Krashi Mantri Dattatray Bharne

राज्यात ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेती बाधित 29 जिल्ह्यातील शेत पिकांना फटका, पंचनामे काम अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार कृषी मंत्री भरणे-


मुंबई : ऑगस्ट महिन्यात राज्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 29 जिल्ह्यातील 191 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे या काळात झालेल्या पावसामुळे 654 पेक्षा जास्त महसूल मंडळामधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे या कालावधीत राज्यात 14 लाख 44 हजार 749 हेक्टर 36 लाख 11 हजार 872 एकर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी दहा हजार हेक्टर पेक्षा जास्त असलेले बारा जिल्हे आहेत यामध्ये 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांची जास्त नुकसान झाले आहे

. ऑगस्ट महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 15 ते 20 तारखेला दरम्यान राज्यातील अनेक भागांत अतीवृष्टी झाली याचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला यामध्ये नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजी नगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड व नागपूर आधी 29 जिल्ह्यातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले यामध्ये सोयाबीन, मका ,कापूस , उडीद ,तूर ,मुग,या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे काही ठिकाणी भाजीपाला फळपिके बाजरी ,ऊस ,कांदा ,ज्वारी व हळद या पिकांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार बाधित भागातील सुरू केलेले पंचनामेचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल एकही शेतकरी मदती पासून वंचित राहणार नाही शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

जिल्हानिहाय नुकसान

  • नांदेड : 6,20566 हेक्टर
  • वाशिम:1,64557 हेक्टर
  • यवतमाळ:1,64932 हेक्टर
  • धाराशिव:1,50753 हेक्टर
  • बुलढाणा:89,782 हेक्टर
  • अकोला : 43,828 हेक्टर
  • सोलापूर :47,266 हेक्टर
  • हिंगोली :40,000 हेक्टर

Post a Comment

0 Comments