'बिंग फुटणार अन् लफडं जगाला कळणार', या भीतीने पोलीस भरती अकॅडमीच्या संचालकाने केले विद्यार्थ्याचे अपहरण; छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील घटना-
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी रूपेश डोलारे : आपल्या लव्हस्टोरीचे बींग फुटेल म्हणून पोलीस भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या सिल्लोड शहरातील एका पोलीस भरती अकॅडमीच्या संचालकाने त्यांच्याच प्रशिक्षणार्थ एका विद्यार्थ्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना केळगाव घाटात शनिवार दिनांक 5 रोजी उघडकीस आली या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी चौघा आरोपीच्या विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की अमोल गजानन मक वय (20) राहणार केळगाव असे अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे तर अपहरण करणाऱ्या आरोपींची नावे हिंदवी करिअर अकॅडमी चा संचालक दशरथ विठ्ठल जाधव (राहणार सिल्लोड) त्यांचा मित्र गणेश कृष्णा जगताप राहणार (वडोजचाथा) अकॅडमी प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी गणेश सोनू सिंग चव्हाण व प्रवीण लालचंद राठोड दोघे राहणार (कोराळा तांड) असे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नावे आहेत. या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून सिल्लोड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना रविवारी दुपारी 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अपहरण झालेली अमोल मक हे सिल्लोड शहरातील हिंदवी करिअर अकॅडमी मध्ये एक वर्षापासून पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होते तेथे त्याची संचालक दशरथ जाधव यांच्यासोबत मैत्री झाली जाधव यांचे अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडले होते त्यात जाधव यांनी अमोलला मोहरा करून दोघांची ओळख करून देण्यास भाग पाडले व पोलीस भरती अकॅडमी प्रशिक्षणाच्या नावाखाली संचालकाचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुली सोबत प्रेम प्रकरण सुरू झाले याबाबत अमोलला संचालकाला हे बरोबर नाही असे सांगून खडसावले .त्यावरून अमोल आणि संचालक जाधव यांच्यात एक महिन्यापूर्वी बिनसले यातून संचालक जाधव यांनी अमोल अकॅडमी मधून काढून टाकले या दोघांच्या प्रेम प्रकरणाचे काही व्हॉइस रेकॉर्डिंग व पुरावे अमोलकडे होते त्याला आपण काढून टाकले आहे त्याने हे पुरावे व्हायरल केले तर आपले बिंग फुटेल या भीतीने जाधव यांनी अकॅडमी मधील प्रशिक्षण घेणाऱ्या दोघा मुलांना मोटरसायकलवर केळगाव येथे पाठवल यानंतर गोडी गुलाबीने अमोलला मोटरसायकलवर केळगाव घाटात बोलवले यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या संचालक जाधव व त्याचा एक मित्र असे एकूण चार आरोपींनी संगणमत करून अमोल लाथा काठ्याने मारहाण केली यावेळी अमोल कडे असलेले प्रेम प्रकरणाचे पुरावे मागितले असता त्यांनी देण्यास नकार दिला यानंतर त्याला सिल्वर रंगाच्या निशान कार क्रमांक MH-48 ए 99 18 यामध्ये जबरदस्तीने बसून त्याचे अपहरण करून कारमधील दाबून सिल्लोकडे(Sillod) नेत असताना अमोलच्या एका ओळखीच्या व्यक्तीने बघितले.
अमोल त्या व्यक्तीकडे मदत मागितली यानंतर सदर व्यक्तींनी या प्रकाराची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळतात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे ,कर्मचारी येथील कुलकर्णी अनंत ,जोशी रमेश व्यवहारे ,विश्वनाथ तायडे रामेश्वर जाधव, विठ्ठल नागलोद यांनी भराडी जवळ फिल्मी स्टाईल सापळा रचून शनिवारी दुपारी 4 वाजता सर्व आरोपींना रंगेहात पकडले त्यानंतर वरील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करत आहेत.

0 Comments