शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी 1932 कोटी निधी मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध-
मुंबई /प्रतिनिधी रूपेश डोलारे: नमोच्या हप्त्याची राज्यातील ९४ लाख शेतकरी प्रतिक्षा करत होते. तसेच योजना बंद झाली, या अफवेने जोर धरला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता मात्र राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मग नमोच्या हप्त्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला .राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी १९३२.७२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र हप्ता वितरणाची तारीख निश्चित झाली नाही. एकंदरीत आता शेतकऱ्यांना या हप्त्याचे कधी वितरण होणार याकडे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजना फेब्रुवारी, २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी ६००० रूपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन २०२३-२४ पासून राबवण्यात येत आहे. या योजनेमध्ये पी. एम. किसान योजनेच्या प्रती वर्ष, प्रती शेतकरी ६ हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी सहा हजार रुपयांची भर घालते. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकदा १२ हजार रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे.




0 Comments