सोलापूरच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या खून प्रकरणातील दोन फरार आरोपी जेरबंद-
लातूर/प्रतिनिधी रूपेश डोलारे : कट मारण्याचे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत चाकूने भोसकुन खून केलेल्या सोलापूरच्या माहिती अधिकार कार्यकर्ता तरुणाचा खून करण्यात आला होता या प्रकरणातील दोघांना अटक (Two Accuse Arrest) करण्यात आली होती. या घटनेतील मुख्य आरोपी सह दोघे फरार होते त्यांना अटक करण्यात आली आहे.
बुधवारी दिनांक 17 रोजीच्या उत्तर रात्री 12 वाजून 45 वाजेच्या सुमारास शहराच्या पाच नंबर चौकातून औशाकडुन जाणाऱ्या बाह्य वळण(Bypass) रस्त्याने क्रुझर जीपला कट मारल्याच्या कारणावरून सोलापूरकडे(Solapur) निघालेले कार मधील अनमोल कवटे या तरुणाचि चाकूने भोसकून त्याचा खून करण्यात आला होता. त्याचप्रमाणे ईरटीका कार मधील त्याची सहकारी सोनाली भोसले(Sonali Bhosale) हिच्यावरी चाकूचे वार केले होते ते सध्या जखमी आहे तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत याप्रकरणी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होतात. यातील दोन आरोपीना(Accuse) अटक करण्यात आली आहे मात्र मुख्य आरोपी विष्णू उर्फ संदीप शिवाजी मामाडगे व मंथन चंद्रकांत मामडगे हे क्रुझर जीप अर्ध्यात सोडून पसार झाले होते. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारावर उर्वरित दोन्ही आरोपींना सोमवार दिनांक 22 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अटक केली आहे मंगळवार दिनांक 23 रोजी त्यांना न्यायालयात (Court) हजर केली असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे(Local Crime Branch Latur) पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर रेणापूरचे(Renapur Police Station) पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वात पोलिसांनी यशस्वी कामगिरी बजावली आहे.
0 Comments