बीड : घरकुल योजनेच्या हप्त्यासाठी दोन हजाराची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात -Beed Acb Trap Gramsevak Gharkul yojna

Hot Posts

6/recent/ticker-posts

बीड : घरकुल योजनेच्या हप्त्यासाठी दोन हजाराची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात -Beed Acb Trap Gramsevak Gharkul yojna

बीड : घरकुल योजनेच्या हप्त्यासाठी दोन हजाराची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात -


बीड : घरकुलाचे दुसऱ्या हप्त्यासाठी बे बाकी प्रमाणपत्रासाठी दोन हजार रुपयाची लाच घेताना केज तालुक्यातील केकतराणी येथील ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे ग्राम प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत एसीबीकडुन मिळालेली  अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील केकतसारणी येथील ग्रामसेवक गंगाधर ठोंबरे यांनी पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्याकडून त्याला दुसऱ्या हप्त्यासाठी लागणाऱ्या बेबाकी प्रमाणपत्रासाठी पाच हजार रुपयाची लाचेची मागणी केली.  त्यानंतर त्यांनी त्याच्यात तडजोड होऊन चार हजार रुपये देण्याची ठरले परंतु तक्रारदाराला ते द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी ग्रामसेवक गंगाधर ठोंबरे हा केज पंचायत समितीच्या आवारात तक्रारदाराकडून दोन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

सदरची सापळा कारवाई पोलीस निरीक्षक समाधान कवडे,राहुल कुमार भोळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र बिडकर ,पांडुरंग काचगुंडे ,अनिल शेळके ,गणेश म्हेञे, संतोष राठोड अविनाश गवळी, प्रदीप सुरवसे ,राजकुमार आघाव ,सचिन काळे ,अंबादास पुरी, गणेश मित्र यांनी केली. याप्रकरणी संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments