विद्यावाचस्पती प्रा. डॉ. महेश चोप्रा यांचा ग्लोबल व्हिलेज शिक्षण संकुलात सन्मान-Itkal Local News Balaghatnewstimes

Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यावाचस्पती प्रा. डॉ. महेश चोप्रा यांचा ग्लोबल व्हिलेज शिक्षण संकुलात सन्मान-Itkal Local News Balaghatnewstimes

विद्यावाचस्पती प्रा. डॉ. महेश चोप्रा यांचा ग्लोबल व्हिलेज शिक्षण संकुलात सन्मान-

प्रा. डॉ. महेश चोप्रा यांचा सन्मान करताना प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, सौ. संगीता शहा - चनशेट्टी


"""""""''''""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे) :- दयानंद शिक्षण संकुलाचे सचिव मा. प्रा. डॉ. महेश चोप्रा यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी पीएच.डी. पदवी संपादन करून शिक्षणक्षेत्रात एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव ग्लोबल व्हिलेज शिक्षण संकुलाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी व सचिवा सौ. संगीता शहा यांनी डॉ. महेश चोप्रा यांचा सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. विजयकुमार उबाळे होते. याप्रसंगी दयानंद कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.या सत्काराला उत्तर देताना डॉ. चोप्रा म्हणाले, माझ्या आजपर्यंतच्या जीवनात अनेक सन्मानाचे प्रसंग आले असतील परंतु या ग्लोबल व्हिलेज संकुलात झालेला सन्मान खूपच अविस्मरणीय असा आहे. येथील आत्मीयता आणि आदराथीत्याने मी भारावून गेलो आहे.पुढे बोलताना म्हणाले की, महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील आधुनिक समाज घडविण्यात ग्लोबल व्हिलेज संकुलाचा मोलाचा वाटा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरापेक्षाही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उच्चस्तरीय सुविधा या संकुलाने उपलब्ध करून दिल्या आहेत. प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी आणि त्यांचे सर्व सहकारी व येथील शिक्षक कौतुकास पात्र आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी म्हणाले की, शिक्षण घेण्यासाठी वय हे कधीच अडथळा ठरत नाही. डॉ. महेश चोप्रा यांच्यासारखे व्यक्तिमत्व हे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्यापासून विध्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रेरणा मिळावी म्हणूनच या ग्लोबल व्हिलेज शिक्षण संकुलात त्यांचा सन्मान करीत आहोत.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. विजयकुमार उबाळे म्हणाले की, ग्लोबल व्हिलेज शिक्षण संकुलाने इतक्या अल्पावधीत खूप चांगल्या पद्धतीने सत्काराचे आयोजन केले, ती कार्यतत्परता इतर मोठ्या संस्थांनाही शक्य झाली नसती. हा दृष्टिकोनच संकुलाच्या प्रगतीचे खरे रहस्य आहे.

या प्रसंगी दयानंद महाविद्यालयाचे अधीक्षक श्री. बिराजदार, संस्थेच्या सचिवा सौ. संगीता शहा, उपाध्यक्ष अनिकेत चनशेट्टी, कोषाध्यक्ष सौ. सुजाता बादोले, संचालक कमलाकर भोसले, अरुण शिंदे, पंडितमामा अचलेरे, ग्लोबल व्हिलेज स्कूलच्या प्राचार्या आसमा नदाफ, जवाहर महाविद्यालय अणदूर येथील प्रा. डॉ. राजशेखर नळगे, प्रा.डॉ. संजय कुलकर्णी, प्रा  डॉ. सिद्धेश्वर बाड, प्रा. डॉ. निंगप्पा सोमगुंडे, प्रा. डॉ. राजशेखर वरशेट्टी, प्रा. डॉ. दगडू सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. संतोष पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सोमनाथ स्वामी यांनी केले.संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments