तुळजापूर : हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनामध्ये काटी गावाचे योगदान महत्वपूर्ण---मा. प्रा. डॉ. जयसिंगराव देशमुख
===========================
तुळजापूर प्रतिनिधी दि,१८: हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये काटी गावचे योगदान महत्वपूर्ण असे मत हुतात्मा गणपतरावजी देशमुख यांचे सुपुत्र प्रा.डॉ.जयसिंगरावजी देशमुख यांनी व्यक्त केले ते प्रशाला काटी येथील ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये काटी गावाने ऐतिहासिक कामगिरी बजावलेली आहे. काटी गावाचे योगदान मोठे आहे. हु.गणपतराव देशमुख यांनी खूप मोठा लढा दिला आहे ते निजामाला कधीही शरण गेले नाहीत. निजामाच्या रजाकार संघटनेला त्यांनी क्रांतिकारी संघटनेच्या विचारातून सशस्त्र लढा दिला आहे. या लढ्यामध्ये गणपतराव देशमुख यांना हौतात्म्य पत्करावे लागले. या संग्रामामध्ये गणपतराव देशमुख यांचे हौतात्म्य फार महत्वाचे आहे. त्यामुळे खुप मोठा सशस्त्र लढा उभारून निजामाच्या विरोधात कारवाई करावी लागली. अखेर निजाम शरण येऊन 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आले. असे मत हुतात्मा गणपतरावजी देशमुख यांचे सुपुत्र प्रा.डॉ.जयसिंगरावजी देशमुख यांनी व्यक्त केले.
ध्वजरोहाणानंतर हुतात्मा गणपतरावजी देशमुख यांचे सुपुत्र प्रा.डॉ.जयसिंगरावजी देशमुख यांचे प्रशाले कडून विशेष स्वागत व सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी डॉ. प्रा. जयसिंगराव देशमुख, शा. व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. श्रीकांत गाटे, संभाजी गाटे उपाध्यक्ष फिरोज खान पठाण, श्रीम दैवशाला आगलावे, माजी सैनिक इशदानी बेग, संतोष गायकवाड, दत्तात्रय ढगे तसेच गावातील उपसरपंच संपत पंके, ज्ञानेश्वर गुरव, गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला तसेच शाळेतील प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.कोळी एच.डी. सर तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.भिसे व्ही.एम. तसेच सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सय्यद मॅडम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री पंकज कासार काटकर सर यांनी केले.




0 Comments