फीस द्यायची सोडून गॅस सिलेंडर का भरला म्हणून तरुणाने केला जन्मदात्या बापाचा खून आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल-Latur Murder Crime
लातुर/ प्रतिनिधी रुपेश डोलारे: माझी पोलीस भरतीची 1000 रुपये फीस भरणे ऐवजी घरात गॅस का भरला असा जाब विचारत एका 24 वर्षीय एकुलत्या एक असलेल्या मुलाने स्वतःच्या 70 वर्षीय पित्याला लाकडाने मारून खून केला आहे ही घटना चाकूर तालुक्यातील पिंपळनेर गावात मंगळवारी दिनांक 16 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, चाकूर तालुक्यातील हिंपळनेर येथील आरोपी अजय देविदास पांचाळ वय (24) याने त्याचे वडील देविदास काशिनाथ पांचाळ वय (70) यांना मला परीक्षेची फीस भरण्यासाठी पैसे न देता तुम्ही गॅस भरून का घेतला असे म्हणत राग मनात धरून सोमवारी दिनांक 15 रोजी रात्री लाकडाने जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. यात आरोपीने स्वतःच्या वडिलांच्या हात, पाय ,डोके संपूर्ण शरीरावर लाकडाने बेदम मारहाण केली यात गंभीर जखमी झालेल्या देविदास पांचाळ यांचा मंगळवार दिनांक 16 रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला अशी तक्रार आरोपीची आई शारदाबाई देविदास पांचाळ वय (50) यांनी दिली आहे या फिर्यादीवरून चाकूर पोलिसांनी आरोपी देविदास पांचाळ यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे घटनास्थळी चाकूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी पोलीस निरीक्षक बालाजी पांडे यांनी भेट दिली न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन नमुने घेतली आहेत या प्रकरणाचा अधिक तपास चाकूर पोलीस करत आहेत.केवळ पैशांसाठी मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

0 Comments