तुळजाई कला केंद्राचा परवाना अखेर कायमस्वरूपी रद्द ; जिल्हाधिकारी यांनी काढला लेखी आदेश
धाराशिव/प्रतिनिधी रुपेश डोलारे : माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांची आत्महत्या प्रकरणातील आरोपी लोकनाट्य कला केंद्रावरील नर्तिका पुजा गायकवाड च्या नावामुळे वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई सांस्कृतिक लोककला नाट्य केंद्र राज्यात चर्चेत आले आहे या लोकनाट्यकला केंद्रावर वाशी पोलिसांनी केलेल्या तपासणीत आणि गैरमार्ग व अनिमित्त समोर आली होती. या प्रकरणी स्थानिक नागरिक महिला विविध संघटना त्याचबरोबर नुकतेच घडलेली उपसरपंच बर्गे यांच्या आत्महत्या सर्वांच्या वादात अडकलेल्या येथील तुळजाई कला केंद्राचा परवाना अखेर कायमस्वरूपी रद्द करावा असे आदेश धाराशिवीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी काढले आहेत. तसेच पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करा असे आदेश दिल्यानंतर त्यांच्या अंमलबजावणी करण्यात आली आहे तुळजाई कला केंद्रावर अनेक गैरप्रकार चालत असल्याचा व नियमाचे उल्लंघन केल्याचा अहवाल तहसीलदार व पोलीस विभागाने सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला या गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या नंतर धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्राचा प्रश्न ऐरणीवर आला होता या अनुषंगाने पूजा गायकवाड ही नर्तिका याच तुळजाई कला केंद्रात होती तिथे त्या दोघांचे प्रेम जुळले होते व या प्रेमाचे रूपांतर वादात टोकाला गेले आत्महत्या पूर्वी बर्गे हे पूजाला भेटायला तुळजाई कलाकेंद्र आली होती त्यावेळी तिने भेटायला बगीला नकार दिला त्यानंतर या दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि बर्गे यांनी तिथून पूजेच्या घरी आईकडे जाऊन सोलापूर जिल्ह्यातील वैराग जवळील सासुरे येथे स्वतः डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केला असता पूजा गायकवाड त्यावेळी तुळजाई कला केंद्रात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे हे कला केंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडले होते
गैरमार्ग नियमाचे उल्लंघन यामुळे अखेर कायमस्वरूपी परवाना रद्द
तुळजाई कला केंद्रामध्ये वाशी तहसीलदार यांच्या अहवालानुसार 44 महिला कलाकार व इतर 12 पुरुष असे कर्मचारी कामास होते परवान्याची प्रत दर्शनी भागावर लावणे आवश्यक असताना ते लावले नसल्याचे ते आढळून आले सदर कला केंद्राची जमीन मालक याने चालक यांना अकरा वर्षाच्या करावी भाडेपट्टाने दिली होती. परवानगी मिळाल्यास कला केंद्र परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये शासनाने दिलेल्या वेळेनुसार दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ कला केंद्र चालू ठेवणार नाही ;कला केंद्रात मद्य विक्री पुरवठा तसेच अवैध व्यवसाय आदी गोष्टी ठेवणार नाही, कला केंद्र परिसरात भविष्यात अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारीच्या घटना घडवू नये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देणार नाही असे हमीपत्र तहसीलदार यांना कला केंद्र चालक यांनी दिले होते .मात्र त्यांचे वारंवार उल्लंघन होत गेले त्याचबरोबर तुळजाई कला केंद्रावर झालेल्या हाणामारीच्या घटना व बीड जिल्ह्यातील उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पूजा गायकवाड हिचा यात आत्महतेशी संदर्भ, दारू विक्री रात्री, पारंपारिक वाद्य ऐवजी डीजेचा सर्रास वापर करणे तसेच स्थानिक नागरिक महिला व ग्रामस्थ विरोध विविध संघटना यांच्या प्रशासनाच्या दरबारी तक्रारी कलाकेंद्रात महिलांनी झालेली छेडछाड व त्या सुरक्षित नसणे यास अन्य कारणे व कागदपत्राची माहिती आम्हाला सोबत जमा केली होती त्या आधारे परवाना जिल्हाधिकारी यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे.
जिल्ह्यात कला केंद्राच्या नावाखाली बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या कला केंद्राचे ताबडतोब परवाने रद्द करण्याचे आदेश
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली कला केंद्रांमध्ये अवैध व्यवसाय आणि शेतकऱ्यांच्या मुलांची आर्थिक पिळवणूक होत असल्यास अशा केंद्रांचे परवाने तातडीने रद्द करण्याचे निर्देश धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत. कला केंद्रांच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे बेकायदा धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.गेल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे एका तरुणाने नर्तिकेच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून तणावात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, एका कुटुंबाला पोरकेपणाला सामोरे जावे लागल्याने समाजात हळहळ व्यक्त होत आहे. धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथील तुळजाई कला केंद्रात नर्तिका पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे या तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून सातत्याने पैसे, सोने आणि जमिनीची मागणी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाने कला केंद्रांमधील गैरप्रकार आणि अवैध धंद्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता.

0 Comments