मौजे इटकळ येथील राष्ट्रीय महामार्ग बनतो मृत्यूचा सापळा,मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहन चालवणे झाले मुश्किल

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे इटकळ येथील राष्ट्रीय महामार्ग बनतो मृत्यूचा सापळा,मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहन चालवणे झाले मुश्किल

मौजे इटकळ येथील राष्ट्रीय महामार्ग बनतो मृत्यूचा सापळा,मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहन चालवणे झाले मुश्किल.


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

*राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा गलथान कारभार वेळोवेळी कल्पना देऊन ही कसलीच सुविधा नाही.*

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे इटकळ येथील मुंबई हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहन चालवणे झाले मुश्किल गेल्या तीन महिन्यात अपघाताच्या संख्येत वाढ वेळोवेळी महामार्ग प्रशासनास माहिती देऊन ही कसलीच कार्यवाही नाही जणु काही येथील महामार्ग असून अडचण नसून खोळंबा अशीच अवस्था झाली आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम झाले पण सोलापूर ते उमरगा हा महामार्ग मात्र अगदी निकृष्ट दर्जाचा झाला असल्याचे दिसून येते या महामार्गावर कसल्याच प्रकारची सुविधा नाही महामार्गावर जागोजागी फूट दीड फुटाचे मोठ मोठे खड्डे पडल्याने आणि त्यात पाऊस सतत असल्याने या महामार्गावर वाहन चालवणे म्हणजे मृत्यूशी झुंजच घेणे असे झाले आहे. या निकृष्ट व दर्जाहीन महामार्गामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण ही खूपच वाढले असुन राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे संबंधित मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसले असल्याचे दिसून येत आहे. मौजे इटकळ येथील भर चौकात तर दोन दोन फूट खोल असे मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत मात्र कसलीच डागडुजी या महामार्गावर केली जात नाही पण फुलवाडी येथे टोल वसुली मात्र मोठ्या जोमात केली जात आहे. वाहन धारकांना वाहन चालवणे या महामार्गावर  सुरक्षित नाही तर टोल वसुली करण्याचा अधिकार ही महामार्गास नाही असे वाहन धारकांकडून बोलले जात आहे. येथील राष्ट्रीय महामार्ग हा निकृष्ट असून वाहन धारकांना वाहन चालवणे मुष्कीलीचे झाले आहे तरी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ येथील महामार्गावर पडलेले भले मोठे खड्डे बुजवून इतर सुविधा तात्काळ द्याव्यात अशी येथील वाहन धारक व नागरिकांची मागणी आहे.


Post a Comment

0 Comments