गहिनीनाथ गड येथे चातुर्मास सत्संग सोहळ्यात रामकथा मोठ्या उत्साहात संपन्न.

Hot Posts

6/recent/ticker-posts

गहिनीनाथ गड येथे चातुर्मास सत्संग सोहळ्यात रामकथा मोठ्या उत्साहात संपन्न.

गहिनीनाथ गड येथे चातुर्मास सत्संग सोहळ्यात रामकथा मोठ्या उत्साहात संपन्न.


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

रामभक्त हभप. वैजनाथ गुट्टे यांनी केले रामकथेचे सादरीकरण.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड देवकरा येथे श्रीसंत मोतीराम महाराज समाधी स्थापनेनिमित्ताने सुरु असलेल्या चातुर्मास सत्संग सोहळ्यात सोमवार दिनांक १५/९/२०२५ रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत रामकथा संपन्न झाली व नंतर मौजे सावरगाव रोकडा येथील ग्रामस्थांनी मधूकरी पध्दतीची मोठी पंगत दिली सावरगाव रोकडा येथील रामभक्तांनी अतिशय उल्हासाने प्रत्येक घरातून सिध्दा व चपाती संकलीत करुन महाप्रसादाची सेवा केली गहिनीनाथ गडावर होत असलेल्या या अनोख्या उपक्रमाची पंचक्रोशीत मोठी चर्चा होत असून हभप सुरदास बाबाराव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गहिनीनाथ गडाचे आध्यात्मिक कार्य मोठे होत असल्याची भावना जनमाणसात तयार होत आहे.बाबाराव महाराजांनी आलेल्या भाविकांना आशिर्वाद दिले.हभप रामभक्त वैजनाथ महाराज गुट्टे यांना रामायण ग्रंथाची सेवा घडावी म्हणून सावरगाव येथील रामभक्तांनी व्यासपिठ सप्रेम भेट दिले आहे.रोकडा सावरगावकरांचे देवकरा ग्रामस्थांनी व रामायणाचार्य हभप बालासाहेब लव्हराळे महाराजांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments