लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार,आरोपीस अटक लातुर जिल्हातील घटना
लातूर/प्रतिनिधी रुपेश डोलारे : एका महिलेस लग्नाचे अमिष दाखवुन जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उदगीर तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की पीडित फिर्यादी महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी करीम रसूल शेख राहणार माकणी तालुका अहमदपूर यांनी पीडित महिलेला लग्नाची आमिष दाखवून दिनांक 1 डिसेंबर 2024 ते 11 ऑगस्ट 2025 दरम्यान उदगीर बस स्थानकासमोरील लॉजवर आणि लातूर येथे घरी जाऊन जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध केले तर फिर्यादी पीडित ने आरोपीस दिलेले पैसे परत मागितले असता आरोपीने शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच तुला खतम करतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध उदगीर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३०९/२५ कलम 64 (2) 69 115,(2) ,352, 351 (2) , (3) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून न्यायालय पुढे हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहिते करीत आहेत

0 Comments