गहिनीनाथ गड येथे चातुर्मासात रंगला सत्संगाच्या माध्यमातून रामकथा निरूपण सोहळा
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
रामभक्त वैजनाथ गुट्टे यांनी केले राम कथेचे निरूपण.
""""""""""'""""""""""""""""”"""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड देवकरा येथे सोमवार दि.२९ सप्टेंबर रोजी चातुर्मासाच्या निमित्ताने सकाळी ११ ते २ श्रीरामकथा संपन्न झाली रामभक्त वैज नाथ गुट्टे यांनी रामकथा सादर केली.त्यानंतर मौजे कारेपूर ता रेणापूर येथील भाविकांनी मोठ्या उत्साहात अन्नदानाची पंगत केली.या कार्यक्रमासाठी मौजे कारेपूर येथून सरपंच हभप.राजूभाऊ काळे,सुप्रसिध्दकिर्तनकार हभप हनुमंत महाराज पल्ले,पंचक्रोशीत सुप्रसिध्द असलेले त्रिकालसंध्या तथा वेदोक्त पध्दतीने आदर्श जिवन जगणारे धर्माधिकारी कुटूंबातील विष्णूदेव धर्माधिकारी यांच्यासह ६०-७० ग्रामस्थ दोन टेम्पो घेऊन आले होते.मोठ्या उत्साहात कथा श्रवण अन्नदान तसेच भगवान गहिनीनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी हभप हनुमंत पल्ले महाराजांनी गडावर सुरु असलेल्या सत्संगसोहळ्याचे तोंडभरून कौतूक केले व बाबू महाराजांच्या कार्याला आमचा सतत पाठिंबा असेल असे आवर्जून सांगितले यावेळी देवकरा,दगडवाडी,जोडवाडी तथा परिसरातील भाविक बहूसंख्येने उपस्थित होते.

0 Comments