जिल्हा परिषद पिंपळगाव डोळा शाळेच्या वतीने अनुजा दशवंत व ऐश्वर्या दशवंत यांचा सत्कार-Dharashiv District Kalanb News

Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद पिंपळगाव डोळा शाळेच्या वतीने अनुजा दशवंत व ऐश्वर्या दशवंत यांचा सत्कार-Dharashiv District Kalanb News

जिल्हा परिषद पिंपळगाव डोळा शाळेच्या वतीने अनुजा दशवंत व ऐश्वर्या दशवंत यांचा सत्कार-Dharashiv District Kalanb News


कळंब : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव डोळा शाळेत अनुजा यशवंत व ऐश्वर्या दशवंत या दोन मुलीचा सत्कार समारंभ पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कालिदास दत्त हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून,श्रीमती स्वामी ताई, सरपंच, पिंपळगाव डोळा, व श्रीमती धस ताई आणि उपसरपंच उमेश धस, हे उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मोहिते संतोष व गुलचंद कदम उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंभीरे सर यांनी केले. सर्वात आगोदर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये उत्कर्षा जगताप, अंकिता जगताप, वैभवी दत्त, वेदिका आडसूळ,या होत्या .

अनुजा यशवंत या विद्यार्थिनींने एमबीबीएस सारख्या कठीण परीक्षेत यश संपादन केले चांगले मार्क्स मिळवले म्हणून या विद्यार्थिनीचा सत्कार प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या शुभहस्ते केला. तर ऐश्वर्या यशवंत या मुलीने एन एस एस ई परीक्षेत राज्यात दहावा क्रमांक पटकावला म्हणून याही मुलीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये तुंदारे नवनाथ यांनी सत्कार मूर्तींचे कौतुक केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आज इंग्रजी शाळा आणि मराठी शाळे मधला फरक पालकांच्या समोर यायला हवा , मराठी शाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची यूपीएससी एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये निवड होते हे समजावून सांगितले तसेच शाळेतील भौतिक सुविधेमध्ये सांगताना शाळा ई लर्निंग द्वारे अध्यापन पिण्याचे फिल्टरचे पाणी शाळेत आहे उत्कृष्ट असा शालेय पोषण आहार दिला जातो सर्व खेळाचे प्रात्यक्षिक शाळेमध्ये घेतली जातात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते याबद्दलची माहिती देण्यात आली.

प्रमुख पाहुण्यांनीही अनुजा दशवन व ऐश्वर्या यशवंत या दोन मुलींचे कौतुक केले त्यांनीही पालकांना मराठी शाळेचे महत्त्व समजावून सांगितले. आभार श्रीमती सुरेखा भाहुले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रामढवे सर, कोरे मॅडम व रहीम शेख यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments