मौजे हंगरगा (तूळ )येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अँड.जयवंत इंगळे यांची बिनविरोध निवड.-itkal Local News Daily

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे हंगरगा (तूळ )येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अँड.जयवंत इंगळे यांची बिनविरोध निवड.-itkal Local News Daily

मौजे हंगरगा (तूळ )येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अँड.जयवंत इंगळे यांची बिनविरोध निवड.-


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने ॲड. जयवंत इंगळे यांचा करण्यात आला सन्मान.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""


इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे हंगरगा (तूळ) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अँड.जयवंत शिवाजीराव इंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

गुरुवार दि.१८ सप्टेंबर २०२५ रोजी रोजी हंगरगा (तूळ) येथील ग्राम पंचायत कार्यालय येथे उपसरपंच पद निवडीसाठी बैठक घेण्यात आली. या ग्रामपंचायत मध्ये एकूण आठ सदस्यांनी ॲड.जयवंत इंगळे यांना उपसरपंच करण्या संबंधी बहुमताचा निर्णय घेतला. आणि सर्वानुमते अँड.जयवंत इंगळे यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली.यावेळी सरपंच रवी शिरसट ,पंचायत समिती सदस्य शिवाजी गोरे, अमोल ननावरे, दादा ननावरे ,तानाजी गव्हाणे ,दादा शिंदे ,शंकर गव्हाणे ,ओंकार ननावरे ,राहुल ननावरे ,आकाश ननावरे यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.अँड.जयवंत इंगळे हे तुळजापूर विधीज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत कायदा क्षेत्रासोबत सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये अँड.जयवंत इंगळे हे सक्रिय असतात व गावच्या विकासामध्ये त्यांचा  नेहमीच पुढाकार असतो त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना नूतन उपसरपंच अँड. जयवंत इंगळे म्हणाले की गावाच्या सार्वजनिक विकासासाठी लोकसभागातून काम करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि ग्रामस्थांनी टाकलेल्या या विश्वासास भविष्यात कधीच तडा जाऊ देणार नाही असे ही ऍड.जयवंत इंगळे यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments