तुळजापूर तालुक्यातील हद्दीतीवरील दहिटणा व अक्कलकोट तालुक्यातील हद्दीवरील काजीकणबस, किणी गावाजवळील नदीवर पुल बांधण्यात यावा दहिटणा ग्रामस्थांची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
तुळजापूर प्रतिनिधी /रुपेश डोलारे : तुळजापूर तालुक्यातील हद्दीवरील गाव दहीटना आणि पलीकडील अक्कलकोट तालुक्याची हद्दीवरील काजीकणबस व किनी या तिन्ही गावाच्या लगत बोरी ओढा आहे . गेली अनेक वर्ष या परिसरामध्ये 15 ते 20 खेड्यांना जोडणारा नदीवरचा पूल प्रलंबित आहे याप्रकरणी दहिटणा ग्रामस्थांनी धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे हा पूल बांधून ग्रामस्थांची गैरसोय टाळावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या मार्गावरील जर पूल झाला तर जवळपास 20 खेड्यांचे दळणवळणाचे साधन वाढवून आणि शैक्षणिक आर्थिक जे या ग्रामीण भागामध्ये नुकसान होते ते सुधारण्यासाठी मदत होणार आहे या सर्व गावांमध्ये शाळा असेल व्यवहार असेल असे अनेक काम या नदीमुळे प्रलंबित आहेत. कच्चा रस्ता आहे नदीवर पूल नसल्याने अनेक वेळा लोकांना पलीकडच्या गावाला जायचं असेल किंवा त्यांना अलीकडे यायचं असेल तर डायरेक्ट नळदुर्ग मार्गे किंवा सुलतानपूर हनूर मार्गे इतका लांब प्रवास करून यावं लागतं आणि मला प्रशासनाला सांगावसं वाटतं श्री क्षेत्र आई तुळजाभवानी आणि श्री क्षेत्र स्वामी समर्थ अक्कलकोट या दोन क्षेत्रांना मधून जाणारा हा रस्ता आहे या पुलाचा मार्ग जर लवकरात लवकर मोकळा झाला तर या परिसरात परिसरातील गावांमध्ये सुख शांती मिळेल व गेले अनेक दिवसापासून ज्या त्रासाला सामोरे जावे लागते तो त्रास कमी होऊन त्या गावची दळणवळण सुधारित होऊ शकतात. आणि ग्रामीण भागातील शिक्षणापासून वंचित असलेली मुलं देखील एकमेका गावामध्ये शिक्षण घेऊ शकतात. तरी वेळोवेळी आम्ही आम्ही प्रयत्न कारून दहिटना ग्रामस्थ किंवा किनी असेल या ग्रामीण भागातील सर्वच होतकरू तरुण मंडळी याच्यासाठी पाठपुरा करत आहेत तरी हा प्रलंबित विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी मी स्वतः ग्रामस्थांच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री माननीय श्री प्रतापजी सरनाईक यांना निवेदन देऊन हा विषय मार्गी लावल्याच्या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांनी देखील आपण पाठपुरावा करा हा विषय कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मार्गी लावू अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आले आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

0 Comments