बीडच्या उपसरपंच आत्महत्या प्रकरणातील नर्तिका पुजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला,पूजा गायकवाडचा पाय खोलात; गोविंद बर्गेंनी वापरलेलं पिस्तुल कुणाचं? पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद-Puja Gaiykwad Aressest Vairag Police

Hot Posts

6/recent/ticker-posts

बीडच्या उपसरपंच आत्महत्या प्रकरणातील नर्तिका पुजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला,पूजा गायकवाडचा पाय खोलात; गोविंद बर्गेंनी वापरलेलं पिस्तुल कुणाचं? पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद-Puja Gaiykwad Aressest Vairag Police

बीडच्या उपसरपंच आत्महत्या प्रकरणातील नर्तिका पुजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला,पूजा गायकवाडचा पाय खोलात; गोविंद बर्गेंनी वापरलेलं पिस्तुल कुणाचं? पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद-


 सोलापुर  /प्रतिनिधी रुपेश डोलारे :   पायातल घुंगरु   पाखरू बनुन भिरभरु र  लागली की  भल्याभल्यांना हा नाद जडतो; मग हा नाद कधी बाद करतो हे अनेकांना कळत नाही हे बार्शीतील सासुरे येथील घटनेनंतर पाहिल्यानंतर कळते जिच्यासाठी जीव ओवाळून टाकला तीच आता भाव देत नाही म्हंटल्यावर त्याने तिच्या घरासमोर येऊन चक्क पिस्टल मधून स्वतःवर गोळ्या गोळ्या मारून घेत आत्महत्या केली, त्यामुळे बार्शी तालुक्यासह वैराग परिसरात एकच खळबळ उडाली होती बीड जिल्ह्यातील लखा मसला येथील उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्वे असे आत्महत्या केलेल्या  व्यक्तीचे नाव आहे. या उपसरपंच आत्महत्या प्रकरणी ज्या नरतिकेच्या घरासमोर येऊन आत्महत्या केली आहे त्या पूजा गायकवाड विरुद्ध वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत शनिवारी दिनांक 13 रोजी पूजाला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला आणखीन दोन दिवसाची वाढीव पोलीस कोठडी दिली आहे त्यामुळे या घटनेमध्ये अनेक आर्थिक व्यावसायिक बाबींची धक्कादायक खुलासे तपासात उघड होत आहेत त्यातच जो गोळी मारण्यासाठी पिस्टल वापरण्यात आला आहे तो नेमका उपसरपंच बर्गे यांचा आहे का पूजा गायकवाड चा आहे याबाबत संभ्रम असल्यामुळे पोलिसांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला आता पुढे पोलीस तपासात काय निष्पन्न होणार याकडे पहावे लागणार आहे .

 या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणी कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीत 02 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणी पोलीस कोठडी संपल्याने आज आरोपी पूजा गायकवाड हिला बार्शी येथील न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पूजाला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी(MCR) वाढवून दिली आहे. यापूर्वी गोविंद बर्गेच्या मेहुण्याने फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी पुजा गायकवाडला (Puja Gaiykwad)  अटक केली होती, त्यावेळी न्यायालयाने तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आता, पूजाचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.


गोविंद बर्गे यांनी पिस्तूल कुठून आणि कशी आणली?पुजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्यातील आर्थिक व्यवहारांची तपासणी करायची आहे. तसेच, वैराग येथील जो प्लॉट पूजा गायकवडच्या नावे आहे, त्यात गोविंद बर्गे हे साक्षीदार आहेत. त्यामुळे पूजाने हा प्लॉट कसा मिळवला, ह्या सर्व बाबींचा तपास करावयाचे असल्याने पोलिसांनी पूजाच्या वाढीव कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. 


बंदुक कुठून आली, पोलिसांचा कसुन शोध सुरू (Vairag police)


 बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील युवक आणि माजी उपसरपंच गोविंद बर्गे हा पारगाव येथील कला केंद्रात नर्तिका असलेल्या पूजा गायकवाडच्या प्रेमात वेडा झाला होता. पूजाचे सर्व हट्ट पुरवत तिच्यासाठी महागडे मोबाईल, सोने, पैसा आणि प्लॉटही त्याने खरेदी करुन दिले होते. मात्र, गोविंदकडून पुजाला आणखी बरंच काही हवं होतं. गेवराई येथील अलिशान घरही पुजाला पाहिजे होते, त्यातूनच दोघांमध्ये खटके उडत होते. आधी प्रेम आणि नंतर दोघांमध्ये निर्माण झालेल्या तणावातूनच गोविंदने आत्महत्या केल्याचा आरोप गोविंदच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच, गोविंदकडे बंदुक नव्हती, त्यामुळे त्यांच्याशी घातपात झाल्याचेही त्याच्या भाच्याने माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे, ही बंदुक नेमकी कुठून आली, या मृत्यूप्रकरणी सत्य काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न वैराग पोलीस करत आहेत.  

Post a Comment

0 Comments