बस मध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास तुळजापूर बस स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण-
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : तुळजापूर शहरातील बस स्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशाच्या गळ्यातील चाळीस हजार रुपयांचे सोन्याची गंठण अज्ञात महिलेने लंपास केले ही घटना तुळजापूर बस स्थानकात दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे .
याबाबत पोलिसांनी मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी संगीता महादेव कंदले वय (45) वर्षे राहणार होट्री ता. तुळजापूर या दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तुळजापूर बस स्थानकात जळकोट कडे जाण्यासाठी दाखल झाल्या होत्या दरम्यान उमरगा बस मध्ये चढत असताना प्रवाशांच्या झालेल्या गर्दीचा फायदा घेते अज्ञात महिलेने संगीता कंदले यांच्या गळ्यातील बारा ग्रॅम मोजण्याचे सोन्याचे गंठण लंपास केले याप्रकरणी कंदले यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे . वारंवार बस स्थानकात घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
बस स्थानकात चोरीच्या घटनेमध्ये वाढ
तुळजापूर शहरातील बस स्थानकामध्ये गेल्या काही महिन्यापासून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ,सोनसाखळी बॅगा व खिशातील मोबाईल पैसे पळवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे हे बस स्थानक पुन्हा चोरटेचे आगार बनले आहे येथे पोलीस नावालाच असून यंत्रणा पुरेशी खबरदारी घेत नसल्याची ओरड प्रवाशांमधून होत आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष घालून या चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्यात याव्या अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
पोलीस तक्रार देऊनही का उपयोग प्रवाशांची खंत
बस स्थानकात अनेक महिलांच्या सोनसाखळ्या चोरी झाली आहेत मोबाईलच्या चोरीच्या घटनेत वाढ झालेली आहे पोलीस ठाण्यात तक्रार करून पोलिसांची डोकेदुखी कोण मागे लावून घेणार? किंवा तक्रार केलीस तर मोबाईल किंवा चोरटा सापडणार याची शाश्वती नाही त्यामुळे बरेच प्रवासी तक्रार देण्यासह टाळत असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे रोज चोरीच्या घटना घडत असताना त्या टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना आजपर्यंत केली गेली नाही व बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत मात्र ते चालू आहेत की बंद आहेत असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे .सीसीटीव्ही चालू असेल तर फुटेज तपासणी गरजेचे आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला चोरट्यांचा शोध घेण्यास मदत होणार आहे तसेच चोरीच्या घटनांना ही आळा बसणार आहे.

0 Comments