दुर्मिळ घटना : साताऱ्यात मातेने दिला ४ अपत्यांना जन्म माता व सर्व अपत्य सुरक्षित डॉक्टरांची माहिती
-
सातारा /प्रतिनिधी रुपेश डोलारे : येथील रुग्णालयास येथे एकाच वेळी एका मातेने 4 अपत्यांना जन्म दिल्याचे अतिशय दुर्मिळ अशी घटना शुक्रवारी घडली आहे. संध्याकाळी सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रशस्ती विभागात ही घटना घडली ही चारी अपत्य सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉ. सदाशिव देसाई यांनी सांगितले .काजोल विकास खाक्रोदीया वय (28) मुळगाव सासवड जिल्हा पुणे असे या मातेचे नाव आहे ही अत्यंत दुर्मिळ घटना असून साधारणपणे १० लाख ते ५ कोटी यामध्ये ० एक असा दर असतो ही माता व तिचे चार अपत्य सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दोन दिवसांपूर्वी ही महिला कोरेगाव येथे आपल्या नातेवाईकाकडे आली असता नातेवाईकांनी डॉ. नितीन जाधव यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता त्यांनी सुविधेच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यास सल्ला दिला त्यानुसार ही महिला जिल्हा रुग्णालयात प्रशस्तीसाठी ही गरोदर माता एडमिट झाली; तिला दम लागत होता व प्रस्तुतीच्या वेदना होत होत्या तिची हॉस्पिटल मध्ये स्टाफ व तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत तपासणी केली असता तिच्या गर्भाशयात एकाच वेळी चार अपत्य असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्या मातेची स्थिती नाजूक असल्याची पाहून डॉ. सदाशिव देसाई यांनी सिजर करण्याचा निर्णय घेत तातडीने सिजर केले असता तिने चार अपत्यांना जन्म दिला प्रथम मुलगी दुसरी वेळ मुलगा पुन्हा दोन मुलींना तिने जन्म दिला त्यांचे अनुक्रमे ११००,१२०० , १३०० आणि १६०० ग्रॅम वजन आहे.
रुग्णालयातील डॉ. सदाशिव देसाई , डॉ. तुषार मसराम हे स्ञी रोग तज्ञ डॉ. नीलम कदम डा. दिपाली राठोड पाटील बालरोग तज्ञ व स्टाफ या सर्वांनी मिळून ती अवघड शस्त्रक्रिया पार पडली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे अधिष्ठाता सातारा डॉक्टर विनायक काळे डॉक्टर दास्विनी मॅडम डॉक्टर सचिन दगडे डॉक्टर राहुल देव खाडे डॉक्टर इनामदार मॅडम यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे या मुलीची ञासातुन सुटका झाली गरोदर महिलेची ही दुसरी खेप असून पहिल्या खेपेला दोन जुळी झाली यामध्ये एक मुलगा व एक मुलगी झाली तिसऱ्या खेपेला या महिलेने चार अपत्यांना जन्म दिला आहे .


0 Comments