कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्वप्न चिरडले; धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील सुग्रीव क्षीरसागर यांचा दोन एकर कांदा मुसळधार पावसाने गेला वाहून, शेतकरी हवालदिल

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव/प्रतिनिधी/रुपेश डोलारे: मागील दोन दिवसापासून जिल्ह्यामध्ये परतीच्या मुसळधार पावसाने कहर केला आहे यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे; या मुसळधार पावसाने धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील सुग्रीव शिरसागर या शेतकऱ्याचा पंधरा दिवसांपूर्वी नवीन लागवड केलेला दोन एकर कांदा अक्षरशा वाहून गेला आहे. क्षीरसागर कुटुंबीयांनी 50 हजार रुपये खर्च करून कांद्याची लागवड केली होती. यामुळे त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे .हे केवळ पावसाचं नुकसान नाही, तर शेतकऱ्याच्या कष्ट  पावसात वाहून गेलेलं भविष्य दिसतंय, अशी प्रतिक्रिया केशेगाव येथील शेतकरी  सुग्रीव शिरसागर यांनी दिली.एकीकडे शेतकऱ्याच्या कांद्याला योग्य भाव मिळत नाही, तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे कांद्याचे पीक पाण्याखाली गेले आहे. कांदा उत्पादकांना कधी बाजारभाव मिळत नाही तर कधी निसर्गाच्या क्रूरतेचा सामना करावा लागतो त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. एकंदरीत या नुकसानीमुळे शेतकरी सुग्रीव शिरसागर हे हवालदिल झाले असून शासनाने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी होत आहे.ब्युरो रिपोर्ट बालाघाट न्यूज टाइम्स धाराशिव

Post a Comment

0 Comments