सिमुरगव्हाण येथे नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शन, दर्शन सोहळ्याचे रोजी आयोजन-
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचा मार्गदर्शन व दर्शन सोहळा श्री क्षेत्र सिमुरगव्हाण तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे 9 व 10 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात 9 सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता उपासक दिक्षा व 10 सप्टेंबर रोजी साधक दीक्षा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविकांनी उपासक दीक्षा व साधक दीक्षा घेण्यासाठी नोंदणी करावी. या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दोन्ही दिवशी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. पीठ अंतर्गत चे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते भाविक साधक शिष्य यांनी जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आव्हान मराठवाडा पीठ प्रमुख जयप्रकाश लोणारी,पीठ सहप्रमुख विजय देशपांडे,पिठ व्यवस्थापक सुरेश मोरे यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे केली आहे.

0 Comments