तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील इंदिरानगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या रस्त्याची दुरावस्था, विद्यार्थ्याचे प्रचंड हाल

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील इंदिरानगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या रस्त्याची दुरावस्था, विद्यार्थ्याचे प्रचंड हाल

तुळजापूर तालुक्यातील चिवरी  येथील इंदिरानगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या रस्त्याची दुरावस्था, विद्यार्थ्याचे प्रचंड हाल

चिखलाचा तुडवीत रस्ता, शाळेला चल माझ्या दोस्ता! चिवरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या  रस्त्याच्या दुरावस्थेने चिमुकल्यांचे हाल


चिवरी/राजगुरु साखरे : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील इंदिरानगर मधील जिल्हा परिषद शाळेअंतर्गत असलेल्या वस्ती शाळेच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.यामुळे विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करून शाळेत जावे लागत आहे.किमान एक दीड किलोमीटरच्या आसपास असलेला या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून अक्षरशः पाणी आणि चिखलातून येथील विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे.पावसाळ्याच्या दिवसांत शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल होत असल्याने निसरडा झाला असुन विद्यार्थी घसरून पडत आहेत. या रस्त्याच्या दुरावस्तीमुळे विद्यार्थ्यासह येथील स्थानिक शेतकऱ्यांनाही रोजच जीव मुठीत धरून  जावे लागत आहे.चिखलाचा तुडवीत रस्ता, शाळेला चल माझ्या दोस्ता! अशी म्हणण्याची वेळ सध्या विद्यार्थ्यांवर  आली आहे .तसेच इंदिरानगरमधील अंतर्गत रस्त्याची देखील प्रचंड दुरावस्था झाली आहे, यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे  याप्रकरणी ग्रामपंचायतचे अक्षम दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एकंदरीत याप्रकरणी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन तातडीने हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा व विद्यार्थी ग्रामस्थांची गैरसोय टाळावी अशी मागणी ग्रामस्थ पालकातून होत आहे.



Post a Comment

0 Comments