नियमभंगाचा ठपका : धाराशिव जिल्ह्यातील पिंजरा कला केंद्राचा परवाना रद्द, तुळजाई कलाकेंद्र पाठोपाठ पिंजरा कला केंद्रावर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई; महिनाभरात दुसरी कारवाई-
धाराशिव /प्रतिनिधी : मागील साधारण महिन्यापूर्वीच वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई लोकनाट्य कला केंद्राचा परवाना नियमभंग केल्या प्रकरणी रद्द करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच धाराशिव तालुक्यातील आळणी येथील बाबासाहेब राजाभाऊ गाठे यांच्या पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राला नियमभंगाचा ठपका ठेवत निलंबनाचा तडाखा दिला आहे. या परवानाधारकाने कार्यक्षेत्रातील अटी व नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने परवाना तात्काळ रद्द करण्यात आला आहे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नियम भंग करणाऱ्या कला केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणाबद्दल देण्यात आलेल्या माहितीनुसार धाराशिव तालुक्यातील आळणी(Aalni) येथे गट नंबर 333 येथे अर्जदार बाबासाहेब राजाभाऊ गाठे यांना पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रास परवाना देण्यात आलेला होता या ठिकाणी लोकनाट्य कला सादरीकरण कार्यक्रमांची अनुमती सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम आदींसाठी अटी व शर्ती घालून परवाना देण्यात आला होता मात्र परवान्यातील अटीचे उल्लंघन झाल्याचे धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात(Dharashiv Gramin Police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा क्रमांक 192 / 2025 व कलम 223 भारतीय न्याय संहिता 2023 आणि हा गुन्हा दाखल झालेला आहे; दरम्यान महसूल प्रशासनाचे आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक या कला केंद्राची तपासणी केली होती यावेळी या कला नाट्य केंद्राच्या संचालकाने परवाना मिळालेल्या अटीचे पालन न करता बेकायदेशीर कृती केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या(LCB) तपासणीत आढळून आले त्यामुळे पोलीस अधीक्षक (SP)व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी (Dysp) या तपासातील गंभीर बाबींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला होता.
या अहवालाच्या आधारे नियम क्रमांक 226 11 अन्वे सदर परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य (Pinjara Kala kendra) कला केंद्राचा परवाना आता रद्द झाला असून पुढील काळात कोणत्याही परिस्थितीत या केंद्राला परवाना देण्यात येणार नाही अशी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. साधारणता महिनाभरापूर्वीच वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई लोकनाट्य(Washi) कला केंद्राचा परवाना नियमभंग प्रकरणी रद्द करण्यात आला होता . यामध्ये नियमाचा भंग करणे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अवैध दारू विक्री अशा गंभीर बाबी समोर आल्या होत्या त्या पाठोपाठ आता आळणी येथील पिंजरा लोकनाट्य कलाकेंद्र जिल्हाधिकारी(Collector) श्री कीर्ती किरण पुजार यांनी निलंबनाचा तडाखा दिल्याने इतर लोकनाट्य कला केंद्र चालकासह शौकीनामध्ये खळबळ उडाली आहे.

0 Comments