मौजे इटकळ येथील शेतकरी अंबादास हाक्के यांच्या पाच एकर सोयाबीन गंजीस अज्ञात व्यक्तीने लावली आग.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
सोयाबीनचा लावलेला ढीग जळून खाक जवळपास अडीच लाख रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
कृषि अधिकारी तलाठी व पोलीस पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन केला पंचनामा.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे इटकळ येथील शेतकरी अंबादास भानुदास हाक्के यांच्या पाच एकर सोयाबीनच्या ढीगास (गंजीस) अज्ञात व्यक्तीने शुक्रवार दि.१० ऑक्टोंबर रोजीच्या मध्यरात्रीच लावली आग सर्व सोयाबीनसह प्लास्टिक पाईप व दोन ताड पत्री जळून भस्मसात शेतकऱ्यांचे जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान ही घटना मौजे इटकळ शिवारात गट नंबर ५५ मध्ये घडली आहे. सविस्तर माहिती अशी की मौजे इटकळ येथील शेतकरी अंबादास भानुदास हाक्के यांची इटकळ शिवारात गट नंबर ५५ मध्ये २ हेक्टर खरीप सोयाबीन होते.शेतकरी अंबादास हाक्के यांनी गेल्या दहा दिवसांपासून आपल्या पत्नीस सोबत घेऊन रात्र दिवस पाच एकर शेत जमीनीवरील पाच पिशव्या सोयाबीन घरीच काढून शेतातच काढलेल्या सोयाबीनचा ढीग लावला होता. पण शुक्रवार दि.१० ऑक्टोंबरच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने सोयाबीन ढिगास आग लावली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं मोठ्या कष्टाने पिकविलेला सोयाबीन जळून खाक झाल्याने शेतकरी अंबादास भानुदास हाक्के चिंताग्रस्त झाले. ही माहिती कळताच कृषि अधिकारी कुलकर्णी, तलाठी तोडकरी , पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीपान कोळी व पोलीस पाटील विनोद सलगरे यांनी प्रत्येक्ष घटनास्थळी भेट देऊन नुकसान ग्रस्त सोयाबीन पिकाचा पंचनामा केला.यावेळी दोन हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन प्लास्टिक पाईप व दोन ताड पत्री जळून भस्मसात झाली असल्याचे दिसून आले जवळपास दोन लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले व त्या प्रमाणे पंचनामा ही करण्यात आला. यावेळी कृषि अधिकारी कुलकर्णी, तलाठी तोडकरी,ग्रामविकास अधिकारी नितीन कांबळे, पोलीस पाटील विनोद सलगरे, उपसरपंच फिरोज मुजावर, माजी सरपंच अरविंद पाटील, राहूल बागडे, श्रीकृष्ण मुळे, राम मंडलिक, सूर्यभान सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकरी अंबादास भानुदास हाक्के यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांना त्वरित शासकीय मदत मिळावी अशी येथील शेतकरी वर्गाची मागणी आहे.


0 Comments