तुळजापूर तालुक्यातील चिंचोली शिवारात ५० गोणी सोयाबीनची चोरी ; अज्ञात चोरटेविरुद्ध गुन्हा दाखल शेतकऱ्यांमध्ये भीतीची वातावरण-
धाराशिव प्रतिनिधी रुपेश डोलारे : तुळजापूर तालुक्यातील चिंचोली शिवारात शेतात ठेवलेले सोयाबीनचे ५० कट्टे चोरून नेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी अज्ञात चोरटेविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी बालवीर बलभीम पाटील (वय .70) रा. चिंचोली यांच्या शेतात काढून ठेवलेले सोयाबीनचे 50 कट्टे जे अंदाजे 50 क्विंटल वजनाचे होते त्याची किंमत 75 हजार रुपये आहे. ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना 8 ऑक्टोंबर च्या रात्री 11 ते 9 ऑक्टोंबर च्या पहाटे पाचच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरटेविरुद्ध नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. अगोदरचं नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या कष्टाने सोयाबीनचे शेतकऱ्याने उत्पादन घेतले. विक्रीसाठी साठवून सोयाबीन ठेवली असता चोरट्यांनी तीही सोयाबीन चोरुन नेली. आसमानी संकटाबरोबरचं सुलतानी संकटाचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यानवर आली आहे .चोरट्यानी आता थेट शेतकऱ्याच्या शेतमालाकडे मोर्चा वळवल्यामुळे चिंचोली पंचक्रोशीतील शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र निर्माण झाले.

0 Comments