मौजे इटकळ येथे विद्युत तारेतील विजेच्या धक्क्याने दुभती म्हैस जागीच ठार.

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे इटकळ येथे विद्युत तारेतील विजेच्या धक्क्याने दुभती म्हैस जागीच ठार.

मौजे इटकळ येथे विद्युत तारेतील विजेच्या धक्क्याने दुभती म्हैस जागीच ठार.


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

शेतकरी गौस मुजावर यांनी नुकतीच एक लाख रुपयांस घेतली होती दुभती  म्हैस.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

महावितरणच्या हलगर्जी पणामुळे शेतकऱ्याच्या दुभत्या म्हैसीस प्राण गमवावा लागला

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे इटकळ येथे विद्युत तारेतील विजेच्या धक्क्याने दुभती म्हैस जागीच ठार ही घटना गुरुवार दि.१६ ऑक्टोंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास धायफुले मिलच्या पाठीमागील विद्युत पोल जवळ घडली.अधिक माहिती अशी की मौजे इटकळ येथील शेतकरी गौस मुजावर यांनी शेतीस जोडधंदा म्हणून दुभती म्हैस घेतली व दररोज पाच लिटर दूध देत असल्याने या दूध विक्रीतून थोडी फार आर्थिक मदत होवू लागली. पण दररोजच्या प्रमाणे शेतकरी गौस मुजावर यांनी गुरुवार दि.१६ ऑक्टोंबर रोजी म्हैस चारण्यासाठी सोडली व ती चरत रस्त्याने जात असताना धायफुले मिल च्या पाठीमागे विद्युत पुरवठा करणारा विद्युत पोल आहे आणि त्या पोल च्या जवळून जाणाऱ्या म्हैसीस विद्युत तारेचा जोराचा धक्का लागला व ती म्हैस जागीच ठार झाली याची माहिती विद्युत महावितरण व पशू वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली त्यानुसार लाईनमन कोळी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा करण्यात आला यावेळी पशू वैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन रीतसर पोस्ट मार्टेम केले यावेळी लाईनमन, पशू वैद्यकीय अधिकारी, शेतकरी गौस मुजावर,पोलीस पाटील विनोद सलगरे, तलाठी गोरोबा तोडकरी, माजी तंटामुक्त अध्यक्ष लियाकत खुदादे उपस्थित होते. आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्याचे खरीप सोयाबीन पाण्याने वाहून गेले व त्यात या महावितरण च्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याच्या दुभत्या म्हैसीस जीव गमावावा लागला. तरी या शेतकऱ्यास महावितरण कंपनीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी येथील शेतकरी वर्गातून मागणी केली जात आहे.

Post a Comment

0 Comments