संतापजनक घटना : अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार, आरोपीविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-
धाराशिव / प्रतिनिधी रुपेश डोलारे : उमरगा तालुक्यातील मुरूम पोलीस ठाण्याचे हद्दीतील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातीलच एका तरुणांनी लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दिनांक ८ रोजी घडली आहे .याप्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत दिनांक १४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पीडित अल्पवयीन मुलगी दिनांक ८ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घरी एकटी होती. यावेळी गावातीलच एका तरुणांनी तिला लॉजवर नेऊन बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास तुला व तुझ्या आईला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून दिनांक १४ रोजी आरोपी तरुणाविरुद्ध पोलिस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

0 Comments