/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> उमरगा : अ‍ॅड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या भावांची सफाई कर्मचारी भगिनींना अनोखी भेट;शहरातील सफाई कर्मचारी महिलांसोबत भाऊबीज साजरी

Hot Posts

उमरगा : अ‍ॅड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या भावांची सफाई कर्मचारी भगिनींना अनोखी भेट;शहरातील सफाई कर्मचारी महिलांसोबत भाऊबीज साजरी

उमरगा : अ‍ॅड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या भावांची सफाई कर्मचारी भगिनींना अनोखी भेट;शहरातील सफाई कर्मचारी महिलांसोबत भाऊबीज साजरी


उमरगा प्रतिनिधी : सध्या सर्वत्र दीपावली हा सण उत्साहात साजरा होताना दिसत आहे. अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत येऊन शेतकऱ्यांच्या दिवाळी सणावर निराशेचे सावट असले तरी नोकरदार व कमावत्या वर्गाने बेफाम फटाके वाजवून धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली आहे.अशा परिस्थितीत उपेक्षित असलेल्या उमरगा शहरातील नगर परिषद महिला सफाई कर्मचाऱ्यांसोबत भाऊबीज साजरी करण्याचा अनोखा उपक्रम येथील अ‍ॅड. शीतल चव्हाण फाउंडेशनने राबवला आहे. 

अ‍ॅड. शीतल चव्हाण फाउंडेशच्या कार्यालयात सर्व महिला सफाई कर्मचाऱ्यांना बोलावून, त्यांना वस्त्र भेट देऊन फाउंडेशनच्या भावांनी बहिणीकडून आशीर्वाद घेतले. यावेळी "आम्हाला चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करण्यासाठी व कष्टकऱ्यांच्या न्याय्य-हक्कासाठी लढण्याकरीता महिला भगिनींच्या आशीर्वादाने बळ मिळावे." अशी भावना अ‍ॅड. शीतल चव्हाण यांनी व्यक्त केली.याप्रसंगी फाउंडेशनचे करीम शेख, प्रदीप चौधरी, किशोर बसगुंडे, कविता साळी आदी पदाधिकाऱ्यासह जवळपास 50 महिला कर्मचारी उपस्थित होत्या.


Post a Comment

0 Comments